घरताज्या घडामोडीKarnala Bank scam case: माजी आमदार विवेक पाटील यांची २३४ कोटींची प्रॉपर्टी...

Karnala Bank scam case: माजी आमदार विवेक पाटील यांची २३४ कोटींची प्रॉपर्टी ईडीकडून जप्त

Subscribe

ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घराचीदेखील झाडाझडती घेतल्याची माहिती समोर आली होती.

सुमारे ५२९ कोटी रुपयांच्या कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणात पनवेल चे माजी आमदार आणि बँकेचे चेअरमन विवेक पाटील यांची सुमारे २३४ केटी रुपयांची मालमत्ता सक्त वसुली संचलनालयाने काल ताब्यात घेतली. पाटील यांच्या या मालमत्तेत त्यांच्या साई कासारभाट येथील मालमत्तेबरोबरच बहुद्देशीय कर्नाळा स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीच्या मालमत्तेचा समावेश आहे.
कर्नाळा बँकेचे चेअरमन या नात्याने विवेक पाटील यांना या घोटाळा प्रकरणात प्रमुख आरोपी करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यावर सक्तवसुली संचलनालयाने हे प्रकरण आपल्याकडे घेत कारवाईला सुरुवात केली होती. तक्रार नोंदवण्यात आल्यावर भाजपच्या पनवेल येथील नेत्यांना सोबत घेत माजी खासदार किरीट सोमय्या यांनी विवेक पाटील यांच्या अटकेच्या मागणीसाठी आघाडी उघडली होती.
याचाच एक भाग म्हणून संचालनालयाने १५ जून २०२१ रोजी विवेक पाटील यांना अटक केली होती. जवळपास ६३ बोगस खात्यांद्वारे ५२९ कोटींचा अपहार करण्यात आल्याचा ठपका ईडीने विवेक पाटील यांच्यावर ठेवला आहे. यातील मोठ्या रक्कमा या कर्नाळा स्पोर्टस् अ‍ॅकॅडमीकडे वळवण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. आपल्या ठेवी परत मिळाव्यात म्हणून खातेदारांनी मोर्चेही काढले होते. ठेवीदारांच्या संघर्ष समितीनेही यासाठी पाठपुरावा केला होता. अशा ठेवीदारांची संख्या ५० हजार ६८९ इतकी असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी काल ईडीने पुढचे पाऊल उचलत कर्नाळा अ‍ॅकॅडेमीच्या मालमत्तेसह विवेक पाटील यांच्या कासारभाट येथील मालमत्तेवर टाच आणली.

- Advertisement -

 


हेही वाचा – मंदिरांपेक्षा जास्त गर्दी दारू दुकानांमध्ये, मग मंदिरे का बंद – फडणवीसांचा राज्य सरकारला सवाल

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -