घरताज्या घडामोडीKartiki Ekadashi 2021: यंदाची कार्तिकी एकादशी नक्की कधी? जाणून घ्या पूजा...

Kartiki Ekadashi 2021: यंदाची कार्तिकी एकादशी नक्की कधी? जाणून घ्या पूजा विधी

Subscribe

यंदाची कार्तिकी एकादशी ही १५ नोव्हेंबरला आली

हिंदू महिन्यात दर महिन्यात एकादशी येते. प्रत्येक महिन्याच्या एकदशीला एक विशिष्ट नाव आणि त्याचे विशिष्ट महत्त्व आहे. एकादशी भगवान विष्णूंना समर्पित केली जाते. कार्तिक महिन्यात येणाऱ्या एकदशीला प्रबोधिनी एकादशी असे म्हटले जाते. या दिवशी चार्तुमासाची सांगता होते. एकादशीचे स्मार्त आणि भागवत असे दोन भाग आहेत. एकाच पक्षात अशाप्रकारचे दोन भेद येतात त्यावेळी पहिल्या दिवशी स्मार्त आणि दुसऱ्या दिवशी भागवत एकादशी लिहिलेले असते. यंदा १४ नोव्हेंबर म्हणजेच रविवारी प्रबोधिनी एकादशी आहे तर १५ नोव्हेंबर म्हणजेच सोमवारी भागवत एकादशी आहे. भागवत एकादशीला पंढरपूरची प्रसिद्ध यात्रा देखील आली आहे. आषाढ शुद्ध एकादशीला देवशयनी एकादशी म्हटले जाते. म्हणजेच या दिवसापासून देव झोपी जातात आणि चार महिन्यांनी कार्तिक शुद्ध एकादशीला देव झोपेतून जागे होतात असा समज आहे त्यामुळे या एकादशीला प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठणी एकादशी असे म्हटले जाते. कार्तिक शुद्ध एकादशीनंतर म्हणजेच द्वादशीला विष्णुप्रबोधोत्सव साजरा केला जातो.

यंदाची कार्तिकी एकादशी ही १५ नोव्हेंबरला आली आहे. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला पंढपूरची वारी केली जाते. याच दिवशी म्हणजेच कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह साजरा केला जातो. तुळशीचा विवाह श्री कृष्णाशी केला जातो. तुळशीचे लग्न लावल्याने कन्यादानाचे पुण्य मिळते असे म्हटले जाते. भगवान विष्णूला तुळस अतिप्रिय आहे. त्यामुळे या दिवशी तुळशीचे पान तोडू नये असे म्हटले जाते. विष्णू पूजेतही तुळशीला फार महत्त्व आहे. समुद्र मंथनातून जेव्हा अमृत निघाले तेव्हा त्याचे थेंब जमिनीवर पडले त्यातून तुळस या वनस्पतीचा जन्म झाला असे मानले जाते.

- Advertisement -

शुभ मुहूर्त

एकादशी तिथीचा प्रारंभ: १४ नोव्हेंबर २०२१ – सकाळी ५:४८ पासून
एकादशी तिथीची समाप्ती: १५ नोव्हेंबर २०२१ – सकाळी ६:३९ वाजता

पूजा विधी

कार्तिकी एकादशीच्या दिवशी पंढरपूरात श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी असते. राज्यातील अनेक जिल्ह्यांमधून पालख्या, वाऱ्या वाजत गाजत पंढरपूरात येतात. ज्यांना पंढरपूरात जाता येत नाही ते घरी राहूनही विठ्ठलाची पूजा करू शकतात.

- Advertisement -

त्याचप्रमाणे प्रबोधिनी एकादशीला भगवान विष्णूची पूजा केली जाते. या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ कपडे परिधान करुन भगवान विष्णूची पूजा करुन उपवास करावा. त्यानंतर संध्याकाळी पूजेच्या ठिकाणी सुंदर रांगोळी काढून तुपाचे ११ दिवे लावावेत. भगवान विष्णूना ऊस, शिंगाड्याच्या पिठाचे पदार्थ, मुरमुऱ्यांचा प्रसाद दाखवला जातो.


हेही वाचा – Fashion Tips: लग्नसोहळा असो किंवा पार्टी ‘या’ चार साड्यांनी तयार करा तुमचा क्लासी लुक

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -