घरताज्या घडामोडीकाशीद पूल २ ऑगस्टपासून वाहतुकीस सुरु होणार?

काशीद पूल २ ऑगस्टपासून वाहतुकीस सुरु होणार?

Subscribe

सध्या या पुलावरून डाव्या बाजूने दुचाकी वाहनांची वाहतूक सुरु करण्यात आली आहे. 

गेल्या काही दिवसापासून राज्यात मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक दुर्घटना घडल्या आहेत. अतिवृष्टीमुळे अनेक रस्ते आणि पूल वाहून गेले. अलिबाग- मुरुड या मुख्य रस्त्यावरील महत्वाचा काशीद पूल ११ जुलैच्या मुसळधार पावसात वाहून गेला. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद होता. मात्र या मार्गाचे नव्याने केलेले काम पूर्ण झाले आहे. येत्या २ ऑगस्ट पासून सदरचा पूल अवजड वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. मुरुड तालुक्यातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

सदरचा पूल कोसळल्यामुळे अलिबाग-मुरुड- मुंबईची वाहतूक ठप्प झाली. मुरुड बस आगाराला दिवसाला जवळपास दैनंदिन साडेतीन लाख रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे. मुरुड येथील सार्वजनिक बांधकाम खात्याने खूप जलद गतीने हे काम पूर्ण करून प्रवासी वर्गाला मोठा दिलासा दिला आहे.बांधकाम खात्याकडून सदरचा पूल पूर्ण करण्याचा ठेका अॅशकोन कनस्ट्रक्शन कंपनीला देण्यात आला होता.हा पूल काँक्रिटच्या रिंगा टाकून जलद गतीने पूर्ण करण्यात आला आहे. या पुलाचे कामही जवळपास पूर्ण झाले आहे. सुरक्षित बॅरिकेट बनवण्याचे व पुलावरील कॉंक्रिटला क्युरिंग देण्याचे काम सुरु आहे. सदरचा पूल किमान २ ऑगस्टला वाहतूकीसाठी सुरु होईल.सध्या या पुलावरून डाव्या बाजूने दुचाकी वाहनांची वाहतूक सुरु करण्यात आली आहे.

- Advertisement -

 

                                                                                                             -उदय खोत(नांदगाव)

- Advertisement -

हेही वाचा – रश्मी शुक्लांनी फोन टॅपिंगसाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली होती का?; नवाब मलिकांचा सवाल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -