ब्रेफअपच्या रागात गर्लफ्रेंडचा बॉयफ्रेंडवर ॲसिड अटॅक, एक डोळा गमावला

Kerala woman throws acid on boyfriend’s face for rejecting marriage proposal
ब्रेफअपच्या रागात गर्लफ्रेंडचा बॉयफ्रेंडवर ॲसिड अटॅक, एक डोळा गमावला

एका तरुणीने बॉयफ्रेंडने ब्रेकअप केल्याच्या रागात त्याच्यावर ॲसिड अटॅक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. केरळमधील इडुक्की जिल्ह्यातील आदिमालीमध्ये ही घटना घडली आहे. इडुक्कीमधील ॲसिड अटॅकमध्ये तरुणाने एक डोळा गमावला आहे. तिरुवनंतपुरममधील खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असून प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. १६ नोव्हेंबरला ही धक्कादायक घटना घडली असून या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, तिरुवनंपुरम जिल्ह्यातील पूजाप्पुरा रहिवासी अरुण कुमारवर आदिमाली इडुक्की जिल्ह्यातील राहणारी ३५ वर्षीय शीबाने ॲसिड अटॅक केला. ॲसिड अटॅकमुळे अरुण कुमारला त्याचा एक डोळा गमावावा लागला. दरम्यान शीबी आणि अरुण कुमारची ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली होती. त्यानंतर दोघांचे एकमेकांवर प्रेम झाले. पोलिसांनी सांगितले की, अरुण कुमार दुसऱ्या मुलीसोबत लग्न करणार असल्याच्या निर्णयामुळे शीबा नाराज होती. त्यानंतर यामुळे शीबाला इतका राग आला की, तिने अरुणवर ॲसिड टाकले.

१६ नोव्हेंबरला मंगळवारी सकाळी घटना घडली. माहितीनुसार, १६ नोव्हेंबरला सकाळी १०.३० वाजता अरुण कुमारला आदिमाली इरुम्पुपलम क्रिश्चियन चर्च जवळ बोलावले होते. शीबावर अरुणच्या चेहरावर ॲसिड फेकल्याचा आरोप लावण्यात आला आहे. दरम्यान ॲसिड फेकल्यामुळे शीबाचा चेहरा आणि हात जळाला आहे. आदिमाली पोलिसांनी शीबाला ताब्यात घेतले आहे. तिरुवनंतपुरम येथील रुग्णालयात अरुणवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर बनली आहे.


हेही वाचा – गर्लफ्रेंडचे लाड पुरवण्यासाठी बॉयफ्रेंड झाला स्वतःच किडनॅप