Makar sankranti 2022 : ‘या’ खिचडीशिवाय मकरसंक्रांतीचा सण अपूर्णच, वाचा सोपी रेसिपी

सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा हा मकरसंक्रातीचा सण साजरा केला जातो. या दिवशी खिचडी बनवण्याची परंपरा आहे.14 जानेवारीला हा सण येत असून, या सणाची मज्जा खिचडीचा आस्वाद घेतल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.

Khichdi Recipe: Makar Sankranti is incomplete without Khichdi, read simple recipe
Khichdi Recipe : 'या' खिचडीशिवाय मकरसंक्रांतीचा सण अपूर्णच, वाचा सोपी रेसिपी

अवघ्या काही दिवसांतच मकर संक्रात हा सण येऊन ठेपला आहे. मकरसंक्रांत म्हटलं की पतंगबाजी आणि तिळगुळ समोर येतात.मात्र यादिवशी खिचडीसुद्धा केली जाते. या खिचडीशिवाय मकरसंक्रातीचा सण हा अपूर्णच आहे. सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा हा मकरसंक्रातीचा सण साजरा केला जातो. या दिवशी खिचडी बनवण्याची परंपरा आहे.14 जानेवारीला हा सण येत असून, या सणाची मज्जा खिचडीचा आस्वाद घेतल्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. तुम्हालाही या खिचडीची रेसिपी माहीत नाही का? मग जाणून घ्या खमंग खिचडी बनवण्याची सोपी रेसिपी.

खमंग खिचडीसाठीचे साहित्य

 1. मूग डाळ – एक वाटी
 2. बाजरी – एक कप
 3. गाजर काप – वाटी
 4. बीन्स – अर्धा कप
 5. वाटाणे – अर्धा कप
 6. हिरवी मूग डाळ – अर्धी वाटी
 7. कांदा – 1 चिरलेला
 8. हळद – अर्धा टीस्पून
 9. जिरे – 1 टीस्पून
 10. लाल तिखट – 1 टीस्पून
 11. चवीनुसार मीठ

भाजीचा वापर करुन खिचडी बनवण्यासाठी खालील स्टेप्स फॉले करा.

 • भाजीची खिचडी बनवण्यासाठी प्रथम मूग डाळ धुवून अर्धा तास भिजत ठेवा.
 • त्यानंतर बाजरी धुवून तासभर पाण्यात भिजत ठेवावी.
 • आता प्रेशर कुकरमध्ये एक टेबलस्पून तेल घाला.
 • तेल गरम झाल्यावर त्यात एक चमचा जिरे घाला.
 • त्यानंतर चिरलेला कांदा घालून मंद आचेवर शिजवा.
 • कांदा हलका तपकिरी रंगाचा झाला की त्यात गाजर, चिरलेली सोयाबीन आणि मटार घालून मिक्स करा.
 • थोडा वेळ शिजल्यानंतर त्यात मूग डाळ आणि बाजरीचे पाणी घाला.
 • नंतर त्यात अजून थोडं पाणी घालून उकळी आणा.
 • आता चवीनुसार मीठ, तिखट आणि हळद घाला.
 • आता प्रेशर कुकरचे झाकण बंद करून तीन ते चार शिट्ट्या होऊ द्या.
 • गरमागरम खिचडी तयार आहे.

हेही वाचा – हिवाळ्यात तिळाचे पदार्थ खाण्याचे आरोग्यदायी फायदे ; वाचा रेसिपी