Khopoli : एसएमएस कंपनीच्या जैवकचराप्रकरणाच्या जनसुनावणीत अत्कर ग्रामस्थांचा तीव्र विरोध

कपंनीच्या विरोधात घोषणाबाजी

Khopoli: Atkar villagers protest against SMS company's bio-waste case,
Khopoli : एसएमएस कंपनीच्या जैवकचराप्रकरणाच्या जनसुनावणीत अत्कर ग्रामस्थांचा तीव्र विरोध

मुबंईतील गोवंडी येथून खालापुर तालुक्यातील अत्करगाव ग्रामपचांयतीच्या क्षेत्रात होवू घातलेल्या जैव वैद्यकीय कचरा विल्हेवाट प्रकल्पाच्या जनसुनावणीत ग्रामस्थांनी प्रचंड विरोध दर्शविला. ग्रामस्थांकडून होणारा टोकाचा विरोध लक्षात घेऊन पोलीस आणि दंगल नियंत्रण पथकाला पाचारण करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली.खोपोलीतील सँम्युअल माँलमध्ये बुधवार १७ नोव्हबंर रोजी दुपारी १२.३० च्या दरम्यान सुरू झालेल्या जनसुनावणीची सुरुवात महाराष्ट्र प्रदुषण नियत्रंण मडंळाचे प्रादेशिक अधिकारी किल्लेदार यांनी जनसुनावणीची माहीती दिली. कंपनीबाबत व परिसरातील भौगोलिक माहितीचा लघुपट दाखवताना मात्र अत्करगावचे माजी उपसरपंच संदीप पाटील यांनी आक्षेप घेत लघुपट थाबंविण्याची जोरदार मागणी केली. यानतंर मात्र अत्करगाव ग्रामस्थ आणि त्या परिसरातून आलेल्या महिला, युवती, नागरिकांनी कपंनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. जनसुनावणीवेळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी स्थानिकांना शांत राहण्याच्या सूचना केल्या. मात्र आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी निवासी जिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांच्या टेबलकडे धाव घेण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी ग्रामस्थांना अडविले. तरीही मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांनी जबरदस्ती करीत लघुपट, तसेच कपंनी व शासनाच्या कर्तव्याबाबत समालोचन करणार्‍या अधिकार्‍यांना ग्रामस्थांनी रोखण्याचा प्रयत्न केला.

तक्रारदारांचे म्हणणे चित्रीकरण करुन रेकाँर्डला घेतले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. सेनेचे माजी जिल्हापरिषद भाई शिदें यांनी जनसुनावणीला कडाडून विरोध दर्शविला, राष्ट्रवादीचे जिल्हायुवक अध्यक्ष अंकित साखरे, सेनेचे तडफदार नेते एकनाथ पिगंळे, अत्करगावचे माजी उपसरपंच संदीप पाटील, मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष मनिष खवळे, अत्करगाव येथील मनसेचे पदाधिकरी संदीप पाटील यांच्यासह अत्करगाव येथील महिला सदस्य व परिसरातील काही ग्रामस्थांनीही सुनावणीस नकार दिला. या जनसुनवाणीला निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती पदमश्री बैनाडे, प्रदुषण नियत्रंण मडंळाचे प्रादेशिक अधिकारी वि. वि. किल्लेदार, खालापूरचे तहसिलदार आयुब तांबोळी खोपोलीचे सह पोलीस निरीक्षक शिरीष पवार उपस्थीत होते.


हे ही वाचा – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह फरार घोषित