घरताज्या घडामोडीKirit Somaiya : कोर्लई दौऱ्याला राजकीय विरोध मान्य नाही, मुख्यमंत्र्यांच्या हरवलेल्या बंगल्याची...

Kirit Somaiya : कोर्लई दौऱ्याला राजकीय विरोध मान्य नाही, मुख्यमंत्र्यांच्या हरवलेल्या बंगल्याची माहिती जनतेसमोर ठेवणार – किरीट सोमय्या

Subscribe

भाजपचे नेते किरीट सोमय्या हे मुख्यमंत्र्याच्या हरवलेल्या बंगल्यांच्या तक्रारीच्या पाठपुराव्यासाठी कोर्लई दौऱ्याला निघाले आहेत. या दौऱ्यात प्रशासनाने अडवले तर माघीरी फिरण्याची तयारी आहे. पण राजकीय विरोध झाला तर तो मान्य नसेल, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्याच्या १८ बंगल्यांचे नेमके काय झाले याची माहिती महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केले. आज सकाळीच किरीट सोमय्या हे आपल्या मुंबईतील निवासस्थानातून कोर्लईच्या दिशेने रवाना झाले. दरम्यान शिवसेनेचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी मुख्यमंत्र्यांची बदनामी करत असाल तर उत्तर देऊ अशा शब्दात इशारा दिला आहे. याठिकाणी शिवसेना विरूद्ध भाजप असा वाद पेटण्याची शक्यता लक्षात घेता मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. (kirit somaiya begins journey for korlai to verify complaint chief minister uddhav thackeray 18 bungalow)

- Advertisement -

दौऱ्यापूर्वी काय म्हणाले किरीट सोमय्या ?

जनतेला वास्तव कळाव यासाठी कोर्लईला निघालो आहोत. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाबतच्या तक्रारीसाठीचा पाठपुरावा करण्यासाठी निघालो आहोत. सरपंचांनी जी माहिती दिली ती सगळी माहिती मला माहितीच्या अधिकारात दिली आहे. माझ्यासोबत दौऱ्या पनवेल, पेण आणि रायगडचे कार्यकर्ते आहेत. त्यांनाही या प्रकरणात नेमके काय झाले, हे समजून घ्यायचे आहे. ग्रामपंचायतीकडे २००९ पासून अन्वय नाईक आणि त्यांच्यानंतर रश्मी उद्धव ठाकरे आणि मनिषा वायकर मालमत्ता कर भरत आहेत. त्यामुळे या बंगल्यांचे नेमके काय झाले हे आम्हाला समजून घ्यायचे आहे. तसेच हे बंगले अचानक कसे गायब झाले हेदेखील समजून घ्यायचे आहे. राज्यातील १२.५ कोटी जनतेला या बंगल्यांची वास्तविकता समजवणार असल्याचेही ते म्हणाले. माणसाकडून चूक होऊ शकते फक्त बंगले आहेत की नाहीत हे ठाकरेंनी सांगावे, असेही सोमय्या म्हणाले.

शिवसैनिकांचा विरोध होण्याची शक्यता

दौऱ्याआधीच किरीट सोमय्या यांना अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी इशारा दिला आहे. मुख्यमंत्र्यांची नाहक बदनामी करत असाल तर उत्तर मिळेल अशा शब्दात त्यांनी इशारा दिला आहे. ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी याआधीच सगळी कागदोपत्री माहिती दिली असल्याचेही ते म्हणाले. आदेश असेल तर शिवसेनेचा दणका दाखवू असा इशारा आमदार भरत गोगावले यांनी दिला आहे. त्यामुळे याठिकाणी शिवसेनेकडून राडा होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर कोर्लई गावात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

- Advertisement -

जानेवारी (आणि मे) 2019 मध्ये श्रीमती रश्मी उद्धव ठाकरे यांनी कोर्लई ग्रामपंचायत अलिबागला त्यांच्या नावावर 19 बंगले ट्रान्स्फर करण्यासाठी पत्र लिहिले असल्याचे पत्र लिहिले होते. तसेच रश्मी ठाकरेंनी या प्रकरणात कोर्लई गावाकडे माफीचे पत्र लिहिल्याचाही दावा किरीट सोमय्या यांनी केला.

शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार यांनी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेत बंगले कुठे आहेत हे दाखवण्यासाठी चार बस भरून पत्रकांचा दौरा करू असे म्हटले होते. बंगले नसलेल्या ठिकाणीच किरीट सोमय्या दावा करत असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले होते. ठाकरे कुटूंबीयांची जाणीवपूर्वक बदनामी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -