घरताज्या घडामोडीलालू यादव यांची प्रकृती चिंताजनक

लालू यादव यांची प्रकृती चिंताजनक

Subscribe

काही महिन्यांपासून त्यांच्या तब्येतीत सतत चढ उतार होत आहे.

राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्या फुफ्फुसात पाणी झाले आहे. यामुळे त्यांना श्वसनाचाही त्रास होत आहे. अशी माहिती लालू यांचे पुत्र व राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी दिली आहे. लालू यांच्यावर रांचीतील रिम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चारा घोटाळाप्रकरणी लालू यांना तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या तब्येतीत सतत चढ उतार होत आहे. यामुळे त्यांना रांची येथील रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र ते उपचारांना प्रतिसाद देत नसून त्यांची शुगरही वाढली आहे. तसेच त्यांच्या फुफ्फुसातही पाणी जमले असून किडनीही व्यवस्थित काम करेनाशी झाली आहे. यामुळे शुक्रवारी रात्री लालू यांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली. यावेळी माजी मुख्यमंत्री व लालू यांच्या पत्नी राबडी देवी, सुपूत्र तेजस्वी यादव, तेज प्रताप यादव आणि मुलगी मिसा भारती पाच तास लालू यांच्याबरोबर होते.

- Advertisement -

दरम्यान, लालू यांची भेट घेतल्यानंतर तेजस्वी यादव यांनी माीडियाशी बोलताना सांगितले की लालू यांच्या काही वैद्यकिय चाचण्यांचे अहवाल येणे बाकी आहे. त्यानंतर त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. मात्र सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -