घरताज्या घडामोडीदिवाळीत विद्यार्थी कुटुंबाला लावणार हातभार

दिवाळीत विद्यार्थी कुटुंबाला लावणार हातभार

Subscribe

कंदील, रांगोळ्या, तोरणांचे स्टॉल उभारले

कोरोनाच्या महामारीमध्ये सध्या शाळा, कॉलेज बंद असल्याने उर्वरित वेळेत काय करणार, असा प्रश्न निर्माण झाला. तसेच या संकटात आर्थिक परिस्थिती ओढवल्याने कर्जतमधील काही मुलामुलींनी दिवाळी सणानिमित्त वेगवगेळ्या आकर्षित वस्तू ठेऊन कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्याचा निश्चय केला. कर्जत पोलीस ग्राऊंड समोर दहिवली येथील डिंपल कांबळे, भिवपुरी येथील भूषण प्रभाळे, वेणगाव येथील अनिकेत गायकवाड, भिसेगाव येथील अनिकेत जंगम या क्लासमेट विद्यार्थ्यांनी एकत्र मिळून हा छोटा व्यवसाय सुरू केला. यामध्ये रंगीबेरंगी आकर्षित करणारे छोटे – मोठे कंदील केवळ १५० पासून पुढे तर सुंदर रेडिमेड रांगोळीचे चित्र, तोरण दहा रुपयात तर सुंदर कोरीव काम केलेल्या पणत्या फक्त ५० रुपये डझन, देवाचे सर्व सामान, दिवे, सुगंधित कापूर, अगरबत्ती, धूप असे नाना तर्‍हेच्या वस्तू ठेवण्यात आल्या आहेत.

कोरोना काळात सर्वच सण-उत्सव साधेपणाने साजरे करण्यात आले. मात्र, सर्वांचा आवडता आणि त्यात बच्चे कंपनीचा अतिउत्साहाचा सण म्हणजे दिवाळी. विविध प्रकारचे फटाके आणून रात्रं-दिवस मित्राच्या संगतीत फटाके वाजवीत बसत. या आनंदात तहान-भूक हरपून फक्त फटाके. मात्र, यावेळेस हा दिवाळीचा सण कसा जाणार या विवंचनेत गृहिणी अधिक विचारात पडल्या आहेत. जरी काटकसरीने साजरी करायची म्हटली तरी कसे कुठून करणार हा मोठा प्रश्न पडत आहे. सणासुदीलाही घरातच बसून साधेपणाने सण साजरा करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. गर्दी होऊ नये म्हणून रक्षाबंधन आणि अन्य सणांच्यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी अनेकांनी स्वतःवर बंधन घालून सणसुद साजरे केले नाहीत.

- Advertisement -

‘आली माझ्या घरी ही दिवाळी…’, असे म्हणत दरवर्षी नव्या दमाने, नव्या उत्साहात दिवाळीचा सण साजरा केला जातो. देशभरात नव्हे तर जगातील अनेक शहरात दिवाळी मोठ्या प्रमाणात साजरी केली जात असली तरी हातावर पोट भरणार्‍या गरिबाच्या झोपडीपासून लखपती करोडपतींच्या आलिशान टॉवरमध्येही तोच झगमगाट दिसत असतो. हीच कर्जतच्या दिवाळीची खासियत आहे. मात्र, आता सध्या हे दिसून येणार नाही. दिवाळीवर यंदा आर्थिक मंदी आणि पावसाचे सावट आहे. असे असतानाही तोरणे, कंदील, पणत्या, शोभिवंत वस्तू, रांगोळी, फराळ, सुका मेवा, कपडे मार्केटमध्ये कमी प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे सर्व व्यापार्‍यांना चांगलाच फटका बसला आहे. शाळा, कॉलेज बंद असल्याने आणि त्यात मामाच्या गावाला जाऊ न शकणार्‍या कर्जतमधील काही विद्यार्थ्यांनी कोरोनावर मात करण्यासाठी आणि घराला हातभार लावण्यासाठी मिळेल तिथे स्टॉल टाकून छोटेछोटे दिवाळीचे सामान विक्रीस ठेवले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -