अरे बापरे ! मुरुड खोरा बंदरात विक्रेत्यांच्या स्टॉलवर कोसळले भलेमोठे दगड

Large stones fell on vendors stalls in murud khora port
अरे बापरे ! मुरुड खोरा बंदरात विक्रेत्यांच्या स्टॉलवर कोसळले भलेमोठे दगड

रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध मुरुड खोरा बंदरात आज सकाळी विक्रेत्यांच्या स्टॉलवर भलेमोठे दगड कोसळले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. यामुळे मोठा अनर्थ टळला. याकडे बंदर खात्याने लक्ष देऊन या परिसरातील डोंगराला सुरक्षा जाळी बसविण्याची मागणी पर्यटकांकडून करण्यात येत आहे.जगप्रसिद्ध मुरुड जंजिरा जलदुर्ग पाहण्यासाठी जगभरातून असंख्य पर्यटक मुरुड खोरा बंदरात येत असतात. सध्या दिवाळी सुट्टीपासून मुरुडकडे पर्यटकांचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोनाकाळात लॉकडाऊनमुळे मुरुडमधील पर्यटन व्यवसाय बंद होते. हे व्यवसाय दीड वर्षानंतर नुकतेच सुरू झाले आहेत.

लॉकडाऊनपासून घरात बसून राहिलेल्या पर्यटकांनी पर्यटनाला सुरूवात केली आहे. खोरा बंदरात पर्यटन व्यवसाय करणारे तसेच येणारे पर्यटक व त्यांची वाहने डोंगराच्या पायथ्याशी पार्क केली जातात. मात्र सुरक्षा जाळी नसल्याने हे क्षेत्र असुरक्षित बनले आहे. सुरक्षेततेसाठी या बंदरातील डोंगराला दरड सुरक्षा जाळी बसविण्याची गरज आहे. या पावसाळ्यात व वादळात खोरे बंदरात दरड कोसळली होती. सतत पडणार्‍या मुसळधार पावसामुळे या डोंगराला मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन डोंगरावरील मोठमोठे दगड ठिसूळ झाले आहेत. त्यामुळे आज झालेल्या अपघाताची पुनरावृत्ती न होण्यासाठी बंदर खात्याने दरड सुरक्षा जाळी बसवावी अशी मागणी पर्यटक व स्थानिकाकडून होत आहे.


हे ही वाचा- Uran : मरणाच्या दारात असणार्‍या जन्मदात्या पित्याला यकृत देऊन लेकीनं वाचविले प्राण