पेणमधील गणपती बाप्पाच्या मूर्तींवर अखेरचा हात

चित्रपट मालिका मधील नावाजलेल्या भुमिका, पात्र अशा मुर्ती तयार करुण घेण्याचा आग्रह मुर्तीकारांकडे केला जात आहे.

last finishing touch of ganpati bappa in pen
पेणमधील गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अखेरचा हात
गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे काहीच दिवस उरले आहेत. पेण तालुक्यातील गणेश मूर्तीच्या कारखान्यात गणेश मुर्तिवर शेवटचा हात फिरवला जात आहे. शाडूची माती, रंग प्लाॅस्टर आफ पॅरीस आदि कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने मागील वर्षाच्या तुलनेत मुर्तीमध्ये २० टक्के दराने वाढ झाली आहे. गणेश चतुर्थीच्या महिनाभर आधीच मूर्तिच्या बुकीगला सुरवात होते.मूर्तीचे डोळे, दागिने आदी रंगरगोटीचे काम सध्या सुरु आहे गणेश मंडळांबरोबर आता घरगुती गणपतीमध्ये नाविन्यपुर्ण मूर्तींला वाढती मागणी आहे. इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्वच भागातून शाडूच्या गणेशमूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
शाडू मूर्तींच्या किमंतीमध्ये झालेली वाढ तसेच हाताळण्यास नाजूक असल्याने मोठमोठ्या गणेशोत्सव मंडळांकडून मात्र अजून प्लॅस्टर आफ पॅरिसच्या मुर्तींनाच मागणी असल्याची माहीती मूर्तीकारांनी दिली आहे.मूर्तीसाठी वापरल्या जाणा-या सोनेरी , चंदेरी रंगाच्या किमती वाढल्या आहेत. चित्रपट मालिका मधील नावाजलेल्या भुमिका, पात्र अशा मुर्ती तयार करुण घेण्याचा आग्रह मुर्तीकारांकडे केला जात आहे. त्याकरीता भाविकांनी सहा महिने अगोदर भाविकांनी बुकींग केले आहे.
बाहुबली, बाजीराव, जय मल्हार, लालबागचा राजा, दगडुशेठ गणपती, टिटवाला अशा अवतारतल्या मुर्तींना सध्या मोठ्या प्रमाणात मागणी आहे.पेण तालुक्यातील गणेश मुर्तीच्या कारखान्यात ग्राहकांची गर्दी वाढत आहे. गडब येथील जर्नादन पाटील, शांताराम पाटील यांच्या गणपतीच्या कारखान्यातील शाडूंच्या मुर्तींना विशेष मागणी असून गणेश भक्तांच्या मागणी नुसार मूर्ती बनविल्या जातात वडीलोपार्जित हा त्याचा गणेशमुर्ती बनविण्याचा व्यवसाय असून आता त्याच्या कारखान्यात त्याची तिसरी पिढी या व्यवसायात  उतरली आहे. नितिन पाटील, आकीन पाटील, सत्यम पाटील, सुंदरम पाटील, अंलकार पाटील, सचिन पाटील, श्रीयोग पाटील,श्रीतेज पाटील यांनी हा व्यवसाय पुढे सुरु ठेवला आहे.
                                                                                                            
                                                                                                               – प्रदीप मोकल