घरताज्या घडामोडीमहाडमधील लेप्टोस्पायरोसिस अखेर नियंत्रणात

महाडमधील लेप्टोस्पायरोसिस अखेर नियंत्रणात

Subscribe

शहरात लेप्टोस्पायरोसिसचे रुग्ण आढळू लागल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती.

महाडमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या पूरामुळे तालुक्यात भयानक परिस्ठिती निर्माण झाली. एकट्या महाड तालुक्यात लेप्टोस्पायरोसिसचे ५९ संशयित रुग्ण आढळून आले होते. पुरानंतर भयानक परिस्थिती निर्माण झाल्यानंतर प्रशासन, पालिका प्रशासन आणि ठाणे महानगर पालिकेने केलेल्या कामामुळे शहर आणि परिसरात उद्भवलेला लेप्टो अल्पावधीतच नियंत्रणात आला आहे. जुलै महिन्यात आलेल्या पुरानंतर सर्वत्र चिखल,कचरा, घाणीचे साम्राज्य पसरले होते. यामुळे रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच शहरात लेप्टोस्पायरोसिसचे रुग्ण आढळू लागल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती.

या दरम्यान स्थानिक प्रशासन, ठाणे महानगर पालिका आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून शहातील स्वच्छतेवर भर देण्यात आला. त्यातच आरोग्य विभाग आणि सामाजिक संस्थांनी सुरू केलेल्या आरोग्य शिबिरांमुळे रोगराई पसरण्यास नियंत्रण आले. शहरात जवळपास ४, तर तालुक्यात ३६ जणांना लेप्टोस्पायरोसिसची लागण झाली होती. जागोजागी असलेले आरोग्य उपचार केंद्र आणि मोफत औषध वाटपातून लेप्टोच्या रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत गेली. आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्सिसायक्लीनसारख्या गोळ्या घेण्यास प्रवृत्त करण्यात आल्याने लेप्टोचा प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्यात मदत झाली असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बावडेकर यांनी सांगितले.

- Advertisement -

…यामुळे होतो प्लेप्टोस्पायरोसिस

लेप्टोस्पायरोसिस हा जीवाणूंचा संसर्गजन्य आजार आहे.कुत्रा, डुक्कर, उंदीर आदी प्राण्यांचे मूत्र रस्त्यावर साठलेल्या पाण्यात मिसळून त्यातून लेप्टोस्पायरोसिस हा आजार होतो.त्यांचे मूत्र शेतातील पाणी,पुराचे पाणी किंवा पावसाचे पाणी दूषित करते व याद्वारे या रोगाचा प्रसार माणसांमध्ये होऊ शकतो. लेप्टोस्पायरोसीसची लक्षणे व उपचार भारतात संसर्गाचा प्रसार पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचल्यानंतर दिसून येतो.पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचण्याचे मुख्य कारण म्हणजे अपुरी सांडपाणी व्यवस्था.एकट्या महाड तालुक्यात आजपर्यंत एवढ्या मोठ्या संख्येने कधीच लेप्टोस्पायरोसिसचे रुग्ण आढळले नव्हते असे सांगून पुरामुळे कोकणात यंदा मोठ्या प्रमाणात लेप्टोस्पायरोसिसचे रुग्ण आढळतील असे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनीही सांगितले होते.


हे ही वाचा – आठ महिन्याच्या चिमुरडीला HIV ची लागण; संक्रमित रक्त दिल्याची घटना

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -