घरताज्या घडामोडीLive Update: पंतप्रधान मोदींनी केरळच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन घेतला पूरपरिस्थितीचा आढावा

Live Update: पंतप्रधान मोदींनी केरळच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन घेतला पूरपरिस्थितीचा आढावा

Subscribe

केरळमध्ये निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीची पंतप्रधान मोदी यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असून अतिमुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे अडकलेल्या नागरिकांची सुखरुपपणे सुटका करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून त्यांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करुया असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

केरळमध्ये पाऊस आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे हवामान खात्याकडून पठानमथिट्टा,कोट्टयम,एर्नाकुलम,इडुक्की,त्रिशूर आणि पलक्कड या सहा जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.केरळमध्ये सध्या NDRFच्या ११ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

हिमाचल प्रदेशच्या कुल्लू जिल्ह्यात १३०००फूट उंचीवर असलेल्या रोहतांग खिंडीत बर्फवृष्टी


अजित पवारांच्या बहिणी जरंडेश्वर कारखान्यात भागीदार आहेत. जरंडेश्वर कारखान्याबाबत पुरावे मी ईडी कार्यालयाला पाठवणार आहे. पोलिसांचा उपयोग माफिया म्हणून होतो. मी सत्य सर्वासमोर आणण्याचे काम करत आहे. माझ्याकडे जरंडेश्वर कारखान्याच्या घोटाळ्याचे पुरावे आहेत – किरीट सोमय्या


पंकजा मुंडे बैठकीसाठी दिल्लीला रवाना झाल्या आहेत. जे.पी.नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे.


मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या नावाखाली खंडणी मागणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे. अटकेतील आरोपींमध्ये मराठी चित्रपट दिग्दर्शक,निर्माता आणि चालकाचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.


मुंबई टपाल विभागाने सुरू केले ‘नो युवर पोस्टमन’ अॅप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -