घरताज्या घडामोडीLive Update: दिल्लीत २४ तासांत ३९५ जण मृत्यूमुखी, २४,२३५ नव्या रुग्णांची नोंद

Live Update: दिल्लीत २४ तासांत ३९५ जण मृत्यूमुखी, २४,२३५ नव्या रुग्णांची नोंद

Subscribe

दिल्लीत गेल्या २४ तासांत २४ हजार २३५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून ३९५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर २५ हजार ६१५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. दिल्लीत सध्या ९७ हजार ९७७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

गेल्या २४ तासात मुंबईत ४ हजार १९२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सविस्तर वाचा 

- Advertisement -

गुरुवारी ६६ हजार १५९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४५ लाख ३९ हजार ५५३ झाली असून अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६ लाख ७० हजार ३०१ वर पोहोचली आहे. सविस्तर वाचा 


१ कोटी डोस अजूनही राज्यांना मिळणार. पुढील २ ते ३ दिवसांत आणखी वितरित करणार – केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन


मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने रेमडेसिवीर इंजेक्शनच्या काळा बाजारात संबंधित असलेल्या लोकांवर आरोपपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले.


पुणे पोलिसांनी कुडजे गावातील फार्म हाऊसवर पार्टी आयोजित करणाऱ्या ९ जणांना अटक केली आहे. पुणे शहरातील उत्तमनगर पोलिस ठाण्यात आयपीसी आणि अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


महाराष्ट्रातील कडक निर्बंध १५ मेपर्यंत वाढवण्यात आले.


गोव्यात आज दिवसभरात ३ हजार १९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ३६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या गोव्यात २० हजार ८९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर यंदा उत्तराखंडमधील प्रसिद्ध चारधाम यात्रा रद्द करण्याचा निर्णय उत्तराखंडचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री तीरथसिंग रावत यांनी घेतला आहे. चारधामची चारही मंदिरात केवळ पुजारी धार्मिक विधी व पूजा करतील असे सांगण्यात आले आहे.


चीफ आर्मी जनरल नरवणे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. कोरोना काळात व्यवस्थापनात मदत करण्यासाठी सैन्य घेत असलेल्या विविध उपक्रमांवर त्यांनी पंतप्रधानांशी चर्चा केली.


खासदार राजीव सातव व्हेटिंलेटरवर असून आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी सांगितले आहे. काही दिवसांआधी सातव यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. पुण्याच्या जहांगिर रुग्णालयात सातव यांच्यावर उपचार सुरु आहेत. काल त्यांना व्हेटिंलेटरवर हलविण्यात आले आहे. सातव यांचा उपचारांना चांगला प्रतिसाद असल्याचे विश्वजीत कदम यांनी सांगितले आहे.


भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. गेल्या ४-५ दिवसांपासून त्यांनी स्वत: क्वारंटाईन केले आहे. कोरोना बाधितांच्या परिवारांना भेटी दिल्या तेव्हा मी त्यांच्या संपर्कात आले. माझ्या सोबत असणाऱ्यांनी टेस्ट करुन घ्या असे त्यांनी म्हटले आहे.


राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी ३ वाजता बैठक घेणार आहेत. या बैठकीत कोरोना लसीच्या आयातीची चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.


अकोला येथे कार्यरत असलेले पोलीस अधिकारी भीमराव घाडगे यांनी केलेल्या परमबीर सिंह यांच्यावरील भष्टाचाराच्या आरोपांवरुन अकोल्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एकूण ३३ अधिकाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.


देशात गेल्या २४ तासात ३ लाख ७९ हजार २५७ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ३ हजार ६४५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात सध्या ३० लाख ८४ हजार ८१४ अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत.


कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठीच्या तरतूदी विचारात घेवून राज्यात यंदा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६१ वा वर्धापन दिन समारंभ गतवर्षी प्रमाणेच अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात यावा, अशा सूचना सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार शाखेमार्फत देण्यात आल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागाने कोविड – १९ च्या अनुषंगाने दिलेल्या सुरक्षित वावर व इतर सर्व नियमाचे काटेकोर पालन करण्यात यावे. सर्वांसाठी मास्क बंधनकारक राहील, याची दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.


दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी निलंबित मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डीला अटक करण्यात आली आहे. अमरावती ग्रामीण पोलिसांनी नागपूर गुन्हे शाखेच्या मदतीने श्रीनिवासवर कारवाई केली आहे.


लसीच्या अभावी आज मुंबईतील ७३ पैकी ४०लसीकरण केंद्र बंद असणार आहेत. उर्वरित ३३ लसीकरण केंद्रावर दुसरा डोस असणाऱ्या लोकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. १ मे पासून राज्यात १८ ते ४४ वयोगटातील लोकांना मोफत लसीकरण केले जाणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मात्र अद्याप राज्यात लसींचा पुरेसा पुरवठा उपलब्ध नाही.

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -