घरताज्या घडामोडीDrug Case Live Update: गेल्या तीन तासांपासून किला कोर्टात सुनावणी सुरू

Drug Case Live Update: गेल्या तीन तासांपासून किला कोर्टात सुनावणी सुरू

Subscribe

गेल्या तीन तासांपासून क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणावर किला कोर्टात सुनावणी सुरू आहे.


आर्यनसह इतर आरोपींची ११ ऑक्टोबरपर्यंत एनसीबीने कोठडी मागितली आहे. दरम्यान आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे यांनी आर्यनला भेटण्यासाठी दोन मिनिटांची परवानगी मागितली होती. कोर्टाने परवानगी दिल्यानंतर मानेशिंदेसोबत शाहरुखची मॅनेजर आर्यनला भेटल्याची माहिती मिळत आहे. सध्या आर्यनच्या जामिनावर सुनावणी सुरू आहे.

- Advertisement -

आज क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील १६ आरोपिंना कोर्टात दाखल केले आहे. सुनवाणीला सुरुवात झाली असून अचित कुमारची रिमांडची मागणी केली. पण या आरोपीचा आर्यन आणि अरबाज मर्चंटचा संबंध आहे. अचित कुमार पुरवठादार आहे. त्याच्याकडे २.६ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला होता.

- Advertisement -

एनसीबीची टीम आर्यला घेऊन कोर्टात हजर झाले आहे. आर्यन खानची आज कोर्टात सुनावणी होणार आहे.


आर्यन खानची आज कोर्टात सुनावणी. आर्यनसह इतर आरोपींना घेऊन किला कोर्टकडे रवाना झाले आहेत. आर्यन खानच्या कोठडीत वाढ होणार की त्याला बेल मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बहिण विजया पाटील यांच्या मुक्ता पब्लिकेशन हाऊसवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. आयकर विभागाच्या ४ अधिकाऱ्यांकडून ही छापेमारी सुरू आहे. पब्लिकेशन हाऊसमधील कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे.


काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्या नवरात्रीच्या शुभेच्छा


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतले मुंबईच्या मुंबादेवीचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्याच्या पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे तसेच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि उपमहापौर सुहास वाडकर यांनी देखील मुंबादेवीचे दर्शन घेतले.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबादेवीचे दर्शन घेण्यासाठी मुंबादेवी मंदिरात दाखल झाले आहेत.मुख्यमंत्री सहकुटुंब मुंबादेवीचे दर्शन घेणार आहेत.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी मुंबईच्या श्री सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन घेतले.


देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्यात. नवरात्री प्रत्येकाच्या जीवनात चांगले आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो अशी प्रार्थना त्यांनी केली.


स्थानिक रहिवाशांनी पोलीसांना दिलेल्या माहितीनुसार बुधवारी ०६ ऑक्टोंबर रोजी सायं. २०:०० वाजताच्या च्या सुमारास गोपाळधाम इमारत जवळ, दिवा आगासन रोड, गणेशनगर, दिवा (पू.) याठिकाणी आकाशातून वीज पडल्याने तेथील रहिवासी प्रभाकर गोविंद अंबारे (६८) यांना गंभीर दुखापत झाल्याने स्थानिक रहिवाश्यांनी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे उपचाराकरिता दाखल केले,यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले अशी माहिती ठाणे प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.


राज्यातील मंदिरे आजपासून भविकांसाठी खुली करण्यात आली असून घटस्थापनेच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातील सर्व प्रार्थनास्थळे दर्शनासाठी नियमांचे पालन करून भाविकांसाठी उघडली गेली आहेत. त्यानिमित्त माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे,पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे , मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि उपमहापौर सुहास वाडकर हे मुंबादेवीचे सकाळी 8.30 वाजता दर्शन घेणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -