Live Update: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना कोरोनाचा संसर्ग

live update

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यांनी स्वतःहून ट्विट करत याची माहिती दिली. मला कोरोनाची लागण झाली असली तरी कोणतीही लक्षणे नाहीत. “माझी तब्येत ठिक आहे. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. आरबीआयचे दैनंदिन कामे सामान्य पद्धतीने सुरु राहतील.”, असे ट्विट त्यांनी केले आहे.

 


पंकजा मुंडे यांनी दुसऱ्या कोणाची तरी भाषा बोलू नये. त्यांनी ऊसतोड कामगारांची अवस्था पाहावी, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केले. ऊसतोड मजूर, मुकादम आणि वाहतूकदार यांना दीडशे टक्के वाढीव भाव मिळावा म्हणून अनेक दिवसांपासून ऊसतोड मजूर संघटनांनी संप पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी भगवानगडाच्या पायथ्याशी ऊस कामगारांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात बोलताना त्यांनी पंकजा मुंडेंवर निशाणा साधला.


भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे साहेब तुमच्या सगळ्यांच्यादृष्टीने मला आशीर्वाद देत आहेत. मी खचत नाही. पण तुम्ही पण खचून जाऊ नका. मुंडे साहेब गेले, मी तुमच्या जीवावर उभी राहिली. तुम्ही खचलात तर माझ्याकडे कोण बघणार आहे? खचायचं नाही. तुमच्या जीवावर मी भक्कम उभी आहे, भक्कम उभी राहणार आहे. कोणालाही चिंता करायची गरज नाही,” असं भावनिक आवाहन भाजप नेत्या पंकज मुंडे यांनी भगवानगडावरुन कार्यकर्त्यांना केलं.


भाजपला राम-राम ठोक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आज एकनाथ खडसे यांनी जळगावमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. तसंच राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी खडसे यांचं औक्षण करुन कार्यालयात स्वागत केलं.


विजयादशमी म्हणजेच दसऱ्या निमित्त देशवासीयींना शुभेच्छा देत पंतप्रधान मोदींनी आजच्या मन की बात कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधला. विजयादशमीचे पर्व हे असत्यावर सत्याच्या विजयाचे व एकप्रकारे संकटावर धैर्याच्या विजयाचे देखील पर्व असल्याचे म्हणाले. सविस्तर वाचा


देशातील करोना संक्रमणाचा दर सध्या कमी होत असून देशासाठी दिलासादायक बाब आहे. आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत भारतात ५० हजार १२९ नवीन करोना संक्रमित रुग्ण आढळले आहेत. यासोबतच आत्तापर्यंतच्या एकूण करोना संक्रमितांची संख्या ७८ लाख ६४ हजार ८११ वर पोहचलीय. देशात सध्या एकूण ६ लाख ६८ हजार १५४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी ११ वाजता ‘मन की बात’ रेडिओ कार्यक्रमाद्वारे संवाद साधत असतात. आज २५ ऑक्टोबर रोजी देखील ते ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधणार आहेत. दसरा, विजयादशमीच्या शुभेच्छांसह कोरोना लस तसेच देशातील महिला अत्याचारांच्या घटनांवर पंतप्रधान मोदी आज बोलण्याची शक्यता आहे. दरम्यान, आजा ‘मन की बात’ कार्यक्रमाला सहा वर्ष पूर्ण होत आहेत.


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आज नागपुरात पार पडला. यावेळी स्वयंसेवकांना लंबोधताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी राम जन्मभूमीचा निर्णय ऐतिहासिक असल्याचं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा या निर्णयाचं स्वागत केलं.


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आज नागपुरात पार पडत आहे. यंदाच्या विजयादशमीला पहिल्यांदाच स्वयंसेवकांच्या कवायती नाही. त्यामुळे आरएसएसच्या पारंपारिक दसऱ्या सोहळा यंदा खंडित झाला आहे. सरसंघचालक मोहन भागवत यंदा विजयादशमी उत्सवात अवघ्या 50 लोकांच्या उपस्थितीत संबोधन करणार आहेत.