घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटLive Update: मुंबईत २४ तासांत आढळले १,२३३ नवे रुग्ण, ४५ जणांचा मृत्यू!

Live Update: मुंबईत २४ तासांत आढळले १,२३३ नवे रुग्ण, ४५ जणांचा मृत्यू!

Subscribe

मागील २४ तासांत मुंबईत १ हजार २३३ नवे रुग्ण आढळले असून ४५ जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा २ लाख ४३ हजार १७२वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ९ हजार ७७६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच मागील २४ तासांत मुंबईत २ हजार ९२ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत एकूण २ लाख १२ हजार ९०५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या मुंबईत १८ हजार ६२४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती महापालिकेने दिली आहे.

- Advertisement -

राज्यात गेल्या २४ तासांत ५ हजार ९८४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून १२५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १६ लाख १ हजार ३६५वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ४२ हजार २४० जणांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा

- Advertisement -

जम्मू-काश्मीरमधील शोपियांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत एका अज्ञात दहशतवाद्याचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे.


राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज राजभवनात मुंबईच्या डब्बावालांना सायकल देण्यात आल्या. राज्यपालांनी १२ सायकलींच्या किल्ल्या डब्बावालांकडे दिल्या.


संततधार पावसामुळे पुण्यातील काही भागात पाणी साचले आहे. शिवाजी नगर परिसरातील हे दृश्य पाहू शकता.


रविवारी संध्याकाळी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (एमसीजीएम) २ कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला आहे. तर 5 जण विद्युतप्रवाहाने जखमी झाले आहेत. मुंबईतील सुमन नगर परिसरातील पाण्याच्या पाइपलाइन दुरुस्तीचे काम करत असतांना हा प्रकार घडला. दरम्यान जखमी कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.


राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये केले दाखल

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची कोविडची चाचणी करण्यात आली असून रिपोर्ट हा निगेटिव्ह आला आहे. खबरदारी म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.


गेल्या २४ तासात राज्यातील पोलीस दलात ६९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सध्या पोलीस दलात २५ हजार ७०१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.


मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करणार. ग्रामस्थांशी चर्चा करणार. त्यानंतर दुपारी तीन वाजता आढावा बैठक घेणार आहेत.


पुलवामा येथील Gangoo जवळ दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला केला. या अतिरेकी हल्ल्यांत एक सीआरपीएफ जवान जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.


देशात आतापर्यंत ७५ लाख ५० हजारांहून अधिकांना कोरोनाची बाधा

देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून हा आकडा आता ७५ लाखांच्या पार गेला आहे. गेल्या २४ तासांत देशामध्ये ५५ हजार ७२२ नव्या रुग्णांची वाढ झाली असून यामध्ये ५७९ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. तसेच आतापर्यंत एकूण ७५ लाख ५० हजार २७३ इतके कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यातील ७ लाख ७२ हजार ०५५ इतके रुग्ण अॅक्टिव्ह असून आतापर्यंत ६६ लाख ६३ हजार ६०८ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याची नोंद आहे. दरम्यान, कोरोनामुळे आतापर्यंत १ लाख १४ हजार ६१० जणांचा जीव गमवावा लागला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची तुळजापुरात पत्रकार परिषद

  • शेतीच्या नुकसानीची मोठी किंमत महाराष्ट्राला मोजावी लागली, काही जिल्ह्यात नुकसानीची टक्केवारी जास्त
  • उस्मानाबाद, नांदेड, लातूर, पंढरपूर, इंदापूर या भागात मोठे नुकसान, उस्मानाबाद हा पूर्ण जिल्हा संकटात
  • सध्या राज्यावर मोठे आर्थिक संकट, कर्ज काढल्याशिवाय पर्याय नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शक्य तितके जास्त कर्ज घ्यावे, अशी विनंती करणार
  • सोयाबीनचे सर्वाधिक नुकसान झाले, सोयाबीन कुजले, वाहून गेले, पाऊस जास्त झाल्यामुळे उसाची लागण यावर्षी मोठ्या प्रमाणात होईल असे दिसते, यंदा उसाचेही नुकसान, उस्मानाबाद जिल्ह्यातील कारखाने सुरू झाले पाहिजेत
  • नदी ओढयाकाठी असलेल्या विहिरी, मोटारी वाहून गेल्या, जनावरे वाहून गेली, घरांचे नुकसान झाले, मी आलो म्हणजे लगेच मदत मिळेल असे नाही – शरद पवार
  • पीक विमा भरण्याचे प्रमाणात वाढ, निकषांच्यानुसार फोटो अपलोड करणे शक्य नाही, मी स्वतः फोटो अपलोड करु शकत नाही
  • पीक विमा ऑनलाईनला शिथीलता द्यावी, काढून ढीग केलेलं सोयाबीन वाहून गेले, त्यांना सुद्धा मदत करणे गरजेचे आहे, शेती वाहून जाणे, सध्या वाहून गेलेल्या पिकांना मदत करण्याची तरतूद नाही, मात्र निकष बदल करणे गरजेचे – शरद पवार
  • संकटातून बाहेर काढण्यासाठी नियम बदलणे गरजेचे, नेत्यांच्या दौऱ्याचा पूर सुरू झाला अशी टीका होते, मात्र याकडे पॉझिटिव्ह पाहिले पाहिजे, शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे मागे उभे राहिले पाहिजे – शरद पवार
  • विधानसभेत जाऊन 53 वर्ष झाली, मी एकही दिवस सुट्टी घेतली नाही, संकटात मी बसू शकत नाही, माझ्या हातात प्रशासनाची जबाबदारी नाही
  • शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने कर्ज घ्यावं; शरद पवारांची मागणी
  • कोरोना संकटात मुख्यमंत्र्यांना एका ठिकाणी बसण्याची विनंती केली आणि आढावा घ्यायला सांगितला, इतर मंत्री फिल्डवर होते, आम्ही दिलेल्या जबाबदारीप्रमाणे मुख्यमंत्री काम करीत आहेत – शरद पवार

देशभरासह राज्यात कोरोनाचा फैलाव गेल्या काही महिन्यांपासून सुरू होता. मात्र सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसतोय. या काळात व्यक्तीना कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्याच्या शरीरात ऑक्सिजनची पातळी कमी होताना दिसतेय. व्यक्तीच्या शरीरातील ऑक्सिजन कमी झाल्यास ऑक्सिजन अभावी त्याच्या जीव गेल्याच्या अनेक घटनाही घडल्या आहे. मात्र ॲाक्सिजनच्या कमतरतेमुळे या कोविड काळात अनेक कोरोना बाधित रुग्णांची परवड झाली आहे. परंतु आता ठाणेकरांना काहीसा दिलासा मिळणार आहे. कारण ठाण्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात ॲाक्सिजनमुळे रुग्णांचे होणारे हाल कमी होणार आहेत. (सविस्तर वाचा)


मध्य रेल्वेच्या लोकल फेऱ्यांमध्ये वाढ

मध्य रेल्वेच्या लोकल फेऱ्यांमध्ये वाढ, 481 ऐवजी आता धावणार 706 लोकलच्या फेऱ्या, 225 फेऱ्या अतिरिक्त चालवल्या जाणार, यात हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकलचा देखील समावेश, 19 ऑक्टोबर पासून म्हणजेच सोमवारपासून या अतिरिक्त फेऱ्या सेवेत दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सोमवारी (19 ऑक्टोबर) सोलापूर दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते सांगवी, अक्कलकोट येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. अवघ्या काही मिनिटात ते मातोश्री निवासस्थानावरुन सोलापूरला रवाना होतील. त्यानंतर ते विमानाने सोलापूरला जातील आणि तिथून पुढे गाडीने सांगवी आणि अक्कलकोटला जातील. नुकसानग्रस्त भागासाठी मुख्यमंत्री काही महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या पाहणी दौऱ्याकडे शेतकऱ्यांसह सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (सविस्तर वाचा)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -