घरCORONA UPDATELive Update News: भाजप नेते सुधीर मुनगंटीवार देखील कोरोना पॉझिटिव्ह

Live Update News: भाजप नेते सुधीर मुनगंटीवार देखील कोरोना पॉझिटिव्ह

Subscribe
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना देखील आज कोरोनाच संसर्ग झाला आहे. आपण पॉझिटिव्ह झालो आहोत, अशी माहिती त्यांनी खुद्द ट्विट करुन दिली आहे. “माझा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून मी स्वतःला विलगीकरण करुन घेतले आहे. माझ्या संपर्कात गेल्या काही दिवसांत जे लोक आले त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी. तसेच कोविड चाचणी करण्यासंबंधी तज्ज्ञ डॉक्टरचा सल्ला घ्यावा” असे मुनगंटीवार यांनी ट्विटरवर सांगितले आहे.


१ ऑक्टोबरला परीक्षा होणार आहेत. यावेळी ११ हजार विद्यार्थ्यांच्या ऑफलाईन परिक्षा घेतल्या जाणार आहेत. तर नापास विद्यार्थ्यांची परीक्षा पुढील १ महिन्यात घेण्यात येणार आहे.

कल्याण : लोकल ट्रेनचा डबा आट्गाव रेल्वे स्टेशन जवळ घसरला. आसनगाव ते कसारा रेल्वे वाहतूक ठप्प

- Advertisement -

भाजपाचे माजी आमदार सरदार तारासिंग यांचे निधन झाले. लिलावती रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. किरीट सोमय्या यांनी ट्विट करून याविषयी माहिती दिली.

- Advertisement -

२२ व २३ सप्‍टेंबर रोजी अंधेरी, गोरेगांव व जोगेश्‍वरीतील काही भागांत पाणीकपात करण्यात येणार आहे. परिसरातील नागरिकांनी पाण्‍याचा यथायोग्‍य साठा करावा आणि पाणी जपून वापरत बृहन्मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्‍या जल अभियंता खात्‍याद्वारे करण्‍यात येत आहे.


नागपुरात आज, उद्या जनता कर्फ्यू!

महापौर संदीप जोशी यांनी लोकांना घरातच रहाण्याचे आवाहन केलं आहे. गेल्या २४ तास १०० लोकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -