घरCORONA UPDATELIVE UPDATES: मुंबईत २४ तासांत १,८३७ नव्या रुग्णांची वाढ, २,७२८ रुग्ण कोरोनामुक्त!

LIVE UPDATES: मुंबईत २४ तासांत १,८३७ नव्या रुग्णांची वाढ, २,७२८ रुग्ण कोरोनामुक्त!

Subscribe

कोरोना व्हायरससह इतर महत्वाच्या घडामोडी या लाईव्ह

मुंबई गेल्या २४ तासांत १ हजार ८३७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच २ हजार ७२८ रुग्ण आज दिवसभरात कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ८६ हजार १५०वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ८ हजार ५०२ रुग्णांचा मृत्यू झाला असून १ लाख ५० हजार ५३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तसेच सध्या २६ हजार ७३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

आज दिवसभरात धारावीत १७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून धारावीतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३ हजार ५०वर पोहोचला आहे. तसेच दादरमध्ये आज २३ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून दादरमधील कोरोनाबाधितांचा आकडा ३ हजार २५९ इतका झाला आहे. तर माहिममध्ये आज २७ नवे कोरोनाबाधित आढळले असून माहिम येथील कोरोनोबाधितांचा आकडा २ हजार ९९२वर पोहोचला आहे.


गेल्या २४ तासांत राज्यात १५ हजार ७३८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३४४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १२ लाख २४ हजार ३८०वर पोहोचला असून यापैकी आतापर्यंत ३३ हजार १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात एनसीबीने जया शहा आणि श्रुती मोदी यांना उद्या चौकशीत सामील होण्यासाठी समन्स बजावले.


लोकसभेने परदेशी योगदान दुरुस्ती विधेयक २०२० मंजूर केले असल्याचे समोर येत आहे.


राज्यात गेल्या २४ तासांत १५८ पोलीस कोरोनाबाधित आढळले असून ५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा २१ हजार ३११ वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत २२२ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून १७ हजार ४३४ पोलीस रिकव्हर झाले आहेत, अशी माहिती राज्यातील पोलीस दलाने दिली आहे.


मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात विनंती अर्ज दाखल केला आहे.


सोनी मराठीवरील ‘काळूबाईच्या नावानं चांगभलं’ या मालिकेच्या सेटवरील २७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. यामधील ज्येष्ठ अभिनेत्री आशालता बावगावकर यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले आहे. सविस्तर वाचा 


राज्यसभा उद्या सकाळी ९ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली.


राज्यसभा १२ वाजेपर्यंत तहकूब


मनसेचे कायदेभंग आंदोलन

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी हा लोकल प्रवास केला आहे. सर्वसामान्यांसाठीही लोकलचा प्रवास सुरू करण्यात यावा यासाठी मनसेने हे सविनय कायदेभंग आंदोलन केले.
रेल्वे पोलिसांना गुंगारा देत संदीप देशपांडे आणि मनसे कार्यकर्त्यांनी हा प्रवास केला. (सविस्तर वाचा)


मनसे कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, रबाळे ते कोपरखैरणे रेल्वे प्रवास

मुंबईची लाईफलाईन अर्थातच मुंबई लोकल लवकर सुरु करा, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरली आहे. नवी मुंबईतील मनसेचे उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले यांनी सविनय कायदेभंग आंदोलन करत आज रबाळे ते कोपरखैरणे रेल्वे प्रवास केला. यासह नवी मुंबईतील नागरिकांच्या सेवेसाठी रेल्वे सुरू करण्याची मागणी केली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रबाळे रेल्वे स्थानकाबाहेर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी निलेश बाणखेले यांना व त्यांच्याही कार्यकर्त्यांना रबाळे पोलिसांनी अटक केली आहे.


देशात संसर्ग होण्याचे प्रमाण वाढून ५४.८७ लाखांवर

सोमवारी भारतातील कोरोना बाधितांच्या संख्येत किंचित घट झाल्याचे समोर आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ९० हजारांहून अधिक रूग्णांची नोंद करण्यात येत होती. मात्र गेल्या २४ तासांत देशात कोरोना विषाणूची ८६, ९६१ नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण वाढून ५४.८७ लाखांवर गेले आहे. (सविस्तर वाचा)


देशात २४ तासांत एकूण ७ लाख ३१ हजारांहून अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्याची माहिती ICMR ने दिली.


भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली

भिवंडीतील पटेल कम्पाऊंड परिसरात तीन मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली असून यामध्ये २० ते २५ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनास्थळी एनडीआरएफची टीम दाखल झाली असून त्यांनी बचावकार्यास सुरूवात केली आहे. आतापर्यंतच्या बचावकार्यात २५ जणांना ढिगाऱ्याखालून काढण्यात एनडीआरएफच्या टीमला यश आले असून आठ जणांचा यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आली आहे. (सविस्तर वाचा)


अनलॉक सुरू झाल्यापासून महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव वेगाने होऊ लागलेला असताना दुसरीकडे बऱ्या होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण देखील वेगाने वाढत आहे. त्यामुळे गेल्या २४ तासांची राज्यातली आकडेवारी पाहिली, तर राज्याचा रिकव्हरी रेट ७३.१७ टक्क्यांवर गेला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात २० हजार ५९८ नव्या रुग्णांची नोंद झालेली असताना २६ हजार ४०८ रुग्ण बरे देखील झाले आहेत. दुसरीकडे ४५५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत जरी असली, तरी दुसरीकडे काही प्रमाणात दिलासा देखील मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या १२,०८,६४२ झाली आहे. (सविस्तर वाचा)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -