घरCORONA UPDATELIVE UPDATES: मुंबईत सलग दोन तासांपासून जोरदार पाऊस

LIVE UPDATES: मुंबईत सलग दोन तासांपासून जोरदार पाऊस

Subscribe

कोरोना व्हायरससह इतर महत्वाच्या घडामोडी या लाईव्ह ब्लॉगद्वारे जाणून घ्या.

मुंबईत सलग दोन तासांपासून जोरदार पाऊस सुरू आहे.

- Advertisement -

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. याबाबत त्यांनी स्वतः ट्विट करून माहिती दिली आहे. तसेच संपर्कात आलेल्या सर्वांना नियम आणि अटींप्रमाणे कोरोना चाचणी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

- Advertisement -

धारावीत आज दिवसभरात १५ नवे रुग्ण आढळले असून धारावीतील कोरोनाबाधितांचा आकडा ३ हजार ६५वर पोहोचला आहे. तर दादरमध्ये २७ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून दादरमधील कोरोनाबाधितांचा आकडा ३ हजार २८६वर पोहोचला आहे. तसेच माहिममध्ये आज दिवसभरात १४ नवे रुग्ण आढळले असून माहिममधील कोरोनाबाधितांचा आकडा ३ हजार ६वर पोहोचला आहे.


उद्या सायंकाळी सहा वाजता सभा घेण्यात येईल, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला


गेल्या २४ तासांत राज्यात १८ हजार ३९० नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ३९२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १२ लाख ४२ हजार ७७०वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत ३३ हजार ४०७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


गेल्या २४ तासांत राज्यात २६३ नवे कोरोनाबाधित पोलीस आढळले असून ७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा २१ हजार ५७४वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत २२९ पोलिसांचा मृत्यू झाला असून १७ हजार ७९७ पोलीस कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ३ हजार ५४८ कोरोनाबाधित पोलिसांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती महाराष्ट्र पोलीस दलाने दिली आहे.


भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा २२ वर पोहोचला आहे.


भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा २१ झाला आहे, अशी माहिती ठाणे महानगरपालिकेने दिली आहे.


विरोधी पक्ष खासदारांनी केलेल्या घोषणाबाजीनंतर लोकसभेचे कामकाज एक तास तहकूब झाले आहे.


खासगी डॉक्टरांनाही ५० लाखाच्या विम्याचे कवच द्या

कोरोना काळात सेवा देणाऱ्या खाजगी डॉक्टरांनाही ५० लाख रुपयांचे विमा कवच देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. त्याच धर्तीवर केंद्र सरकारनेही हा निर्णय घेऊन कोरोनाशी सापना करणाऱ्या खाजगी डॉक्टरांना ५० लाख रुपये विम्याचे कवच द्यावे अशी मागणी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज केंद्रीय संसदीय अधिवेशनात केली आहे.(सविस्तर वाचा)


बारामती तालुका पोलिसांनी सोमवारी रात्री मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल ४६ लाखांचा गांजा असलेला टेंपो मुद्देमालासह ताब्यात घेतला आहे. (सविस्तर वाचा)


शरद पवारांचा अन्नत्याग!

शेती बिलावरून रविवारी राज्यसभेत झालेल्या राड्यावर गेल्या २ दिवसांपासून मोठा गोंधळ सुरू आहे. त्यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील खासदार शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी राज्यसभेत आक्रमक झालेल्या खासदारांची पाठराखण केली. तसेच, विधेयक पारित करण्यात सरकारकडून राबवण्यात आलेलं धोरण आणि खासदारांचं निलंबन याविरोधात खासदारांनी केलेल्या आंदोलनात मीही सहभागी होऊन एक दिवस अन्नत्याग करत आहे, असं शरद पवारांनी जाहीर केलं. (सविस्तर वाचा)


बाधितांचा आकडा ५५ लाखांपार!

भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम वाढतच आहे. मंगळवारी देशात कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या ५५ लाखांपार गेल्याचे समोर आले आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत कोरोना विषाणूची लागण झालेल्या ७५ हजार ०८३ नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. (सविस्तर वाचा)


औरंगाबादच्या महापौरांना कोरोनाचा संसर्ग

औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर औरंगाबादेतील सिग्मा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. नंदकुमार घोडेले यांना गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची लक्षण जाणवत होती. म्हणून त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती. या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर त्यांच्यावर औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


दिवसभरात ९ लाख ३३ हजारांहून अधिक कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्याची माहिती ICMR कडून देण्यात आली आहे तर देशात आतापर्यंत एकूण ६,५३,२५,७९९ जणांनी आपल्या कोरोनाच्या चाचण्यांना केल्याचे सांगितले जात आहे.


ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर (वय ७९) यांचे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. आई माझी काळूबाई या मालिकेच्या सेटवर २७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्री आशालता बावगावकर यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. (सविस्तर वाचा)


एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना कोरोना

पोलीस विभागातील एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. मागील २ दिवसांपासून त्यांना सातत्याने ताप येत असल्याने डॉक्टरांनी त्यांना कोरोना चाचणी करण्यास सांगितले. सोमवारी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. दया नायक सध्या एटीएसमध्ये नियुक्त असून एटीएसच्या जुहू युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत. मुख्यमंत्र्यांसह पवारांच्या धमकी प्रकरणाच्या तपासादरम्यान कोरोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


पुण्यात १,२५६ जण कोरोनामुक्‍त

पुणे शहरात सोमवारी नवीन कोरोनाबाधितांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे. दिवसभरात ८८४ बाधित नव्याने सापडले असून, १ हजार २५६ जण कोरोनामुक्‍त झाले आहेत. तर गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ३७ जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. सोमवारी दिवसभरात केवळ २ हजार ६९७ संशयिताची तपासणी करण्यात आली. तर आतापर्यंत तब्बल ५ लाख ७७ हजार ६२९ जणांच्या तपासणी अहवालातून १ लाख ३२ हजार ६६५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यातील आतापर्यंत तब्बल १ लाख १२ हजार १७२ जण कोरोनामुक्‍त झाले आहेत.


राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असली तरी कोरोनामुक्त होण्याची संख्येत देखील वाढ होताना दिसत आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७४.८४ टक्क्यांवर पोहोचले आहे. गेल्या २३ तासांत राज्यात १५ हजार ७३८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३२ हजार ७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच ३४४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १२ लाख २४ हजार ३८०वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ३३ हजार १५ रुग्णांचा मृत्यू झाला असून ९ लाख १६ हजार ३४८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यातील कोरोनातून बरे होणाऱ्यांच्या संख्येने रशियाला मागे टाकले आहे. (सविस्तर वाचा)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -