घरताज्या घडामोडीCyclone Tauktae Live Updates: जिल्ह्यातील समुद्रकिनारी राहणाऱ्या ६ हजार ४८७ नागरिकांचे स्थलांतरण...

Cyclone Tauktae Live Updates: जिल्ह्यातील समुद्रकिनारी राहणाऱ्या ६ हजार ४८७ नागरिकांचे स्थलांतरण झाले पूर्ण

Subscribe

‘ताक्ते’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील समुद्र किनारी राहणाऱ्या आतापर्यंत ६ हजार ४८७ नागरिकांचे स्थलांतरण पूर्ण झाले असून तालुकानिहाय स्थलांतरित लोकांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

अलिबाग-३४४, पेण-१९३, मुरुड-१०६७, पनवेल-१६८, उरण-४५१, कर्जत-०, खालापूर-१७६, माणगाव-४९०, रोहा- ४७८, सुधागड-१६५, तळा- १३५, महाड-१०८०, पोलादपूर-८६, म्हसळा- ४९६, श्रीवर्धन- ११५८
या एकूण ६ हजार ४८७ लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

- Advertisement -

पुण्यातील खेड तालुक्यात भोरगिरी आणि भिवेगाव येथे ७० घरं, दोन अंगवाडी, प्राथमिक शाळा आणि ग्रामपंचायत ऑफिसचे तोक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झाले आहे, अशी माहिती पुणे जिल्हा परिषदने दिली आहे.

- Advertisement -

काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचं पार्थिव हिंगोलीतील मूळ गाव कळमनुरीत दाखल झाले आहे. वर्षा गायकवाड, विश्वजित कदम उपस्थित आहेत. सातव यांच्या अंत्यदर्शनासाठी ग्रामस्थानांची गर्दी


तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बेस्ट उपक्रमाच्या वाहतूक विभागातर्फे विविध ठिकाणी वाहतूक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच विद्युत पुरवठा विभागातर्फे नियंत्रण कक्षांमध्ये अधिकाऱ्यांची नेमणूक अधिकांशाने करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे वाहतूक आणि विद्युत पुरवठा विभागातर्फे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन कक्षांमध्ये देखील उपक्रमाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.


गोव्यात २४ तासांत १ हजार ३१४ नवे कोरोनाबाधित आढळले असून ४३ जणांच्या मृत्यू नोंद झाली आहे. तर ३ हजार ८९३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


भारतीय तटरक्षक दलाने गुजरातमधील मच्छिमार आणि इतर स्थानिक लोकांना समुद्रात जाऊ नका आणि चक्रीवादळाच्या दृष्टीने जवळच्या बंदरावर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.


तोक्ते चक्रीवादळामुळे उद्या मुंबईत लसीकरण बंद राहणार


तोक्ते चक्रीवादळामुळे मागील २४ तासांत ६ जिल्ह्यांत, ३ किनापट्टी जिल्हात आणि ३ मलनाड जिल्ह्यात जोरदार ते अती मुसळधार पडला. आतापर्यंत ४ लोकांचा मृत्यू झाले असून ७३ गावांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती कर्नाटक राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे.


एनडीआरएफची (NDRF) पाच टीम आज पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अहमदाबाद, गुजरात येथे एअरलिफ्ट होतील.


तोक्ते चक्रीवादळामुळे गोव्या जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत असून पणजीमध्ये झाडे कोसळली आहेत.


आयएमडीने तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये येलो अलर्ट जारी


तोक्ते चक्रिवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्याला बसला आहे. वादळामुळे दुपारी १२ वाजता ४० घरांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर ३१ ठिकाणी झाडे पडली आहेत. ३ शाळांचे देखिल मोठे नुकसान झाले आहे.


अरबी समुद्राच्या पश्चिम किनारपट्टी लगत असल्याने रत्नागिरी जिल्हयाला तौक्ते चक्रीवादळाचा तीव्र तडाखा बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारतीय हवामान खाते यांनी वर्तविलेल्या अंदाजानुसार चक्रीवादळ रत्नागिरी जिल्हयाच्या किनारपट्टीवरील राजापूर, रत्नागिरी, गुहागर, दापोली व मंडणगड या पाच तालुक्यांना याचा तडाका बसण्याची शक्यता आहे. या वादळामुळे कच्ची घरे/ पत्र्याची घरे, गुरांचे गोठे यांची पडझड होवून जिवितहानी होऊ नये, व जिल्हयातील नागरीकांचे सुरक्षतेसाठी ठोस उपाय योजना म्हणून योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक  आहे. लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रत्नागिरी यांना आपत्ती व्यवस्थापन अधिनीयम 2005 चे कलम 34 अन्वये प्राप्त अधिकारानुसार, रत्नागिरी जिल्हयातील लोकांची तौक्ते चक्रीवादळामुळे जिवीत हानी होऊ नये म्हणून दिनांक १६ ते १७ मे २०२१ या कालावधीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.  कोणत्याही त्यांच्या अत्यावश्यक सेवा वगळून अन्य कोणत्याही गोष्टींसाठी घराबाहेर पडण्यास मनाई आहे.


तोक्ते चक्रिवादळाने राजापूर तालुक्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने कच्चा घरात राहणाऱ्या ६५२ नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.


मच्छिमारीसाठी समुद्रात गेलेल्या ५१२ नौका समुद्रकिनारी सुखरूप पोहचल्या आहेत. चक्रीवादळाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने मच्छीमारांसाठी तसेच समुद्रकिनारी रहिवासी असलेल्या नागरीकांसाठी अलर्ट जारी केला होता. मच्छीमार आणि नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून पालघर जिल्ह्यातील सर्व नौका समुद्रकिनारी परत आल्या आहेत


मुंबईतील टाटा रुग्णालयात देशभरातून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची प्रचंड गैरसोय होते. या प्रश्नावर तोडगा म्हणून म्हाडाच्या १०० खोल्या टाटा रुग्णालयाला देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारने घेतला आहे. आज म्हाडाच्या १०० खोल्यांच्या चाव्या शरद पवारांच्या हस्ते टाटा रुग्णालयाचे प्रमुख डॉ. बडवे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्या.


राजीव सातव आगामी काळात प्रचंड क्षमता असलेले नेते होते – पंतप्रधान नरेंद्र मोदी


आमचे सहकारी व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव खा. राजीव सातव यांचे अकाली निधन अतिशय वेदनादायी असून, नियतीने एका प्रतिभाशाली उमद्या नेतृत्वाला हिरावून घेतले – अशोक चव्हाण


खासदार राजीव सातव यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
तरुण व तडफदार खासदार राजीव सातव यांच्या अकाली निधनाचे वृत्त समजून व्यथित झालो. सातव  करोनावर मात करून लवकरच बाहेर येतील असे वाटत असतानाच ही दुखद बातमी आली. सातव यांचेकडे नेतृत्वगुण व संघटन कौशल्य होते. त्यांचा जनसंपर्कही व्यापक होता. दुर्दैवाने काळाने एक मोठी क्षमता असलेले नेते आपल्यातून हिरावून नेले आहे. त्यांच्या आत्म्यास प्रभुचरणांजवळ स्थान मिळो ही प्रार्थना करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबियांना व चाहत्यांना कळवतो असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.


माझा मित्र, माझा भाऊ राजीव सातव आज आमच्यात नाही. भावपूर्ण श्रद्धांजली. राजीव सातव यांच्या जाण्याने झालेली हानी कधीच भरुन निघणारी नाही – नाना पटोले


काँग्रेसचे खासदार व आमचे संसदेतील सहकारी राजीवजी सातव यांचे निधन झाले. ही आम्हा सर्वांसाठी अतिशय दुःखद बातमी आहे.त्यांनी कोरोना विषाणूशी जोरदार झुंज दिली. पण ही झुंज अपयशी ठरली. ते एक उत्तम संसदपटू तर होतेच याशिवाय ते माणूसकी जपणारे नेते होते. लोकशाही, धर्मनिरपेक्षता व समतेच्या मूल्यासाठी संघर्ष करणारा एक तरुण नेता गमावला आहे – सुप्रिया सुळे


काँग्रेस नेते आणि काँग्रेस कार्यकारी समितीचे निमंत्रक राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. महाराष्ट्रातील तरुण, तडफदार आणि अभ्यासू नेतृत्व अशी त्यांची ओळख होती.गुजरातमधील निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने सोपवलेली प्रभारीपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत पक्षाला चांगले यश मिळवून देण्याची भूमिका त्यांनी पार पाडली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला आहे – शरद पवार


काँग्रेसचे युवा नेते,खासदार राजीव सातव यांच्या निधनांमुळे महाराष्ट्राने,देशाने एक अभ्यासू,कार्यकुशल,आश्वासक नेतृत्व गमावले आहे. त्यांचे सर्व पक्षांच्या नेत्यांशी,कार्यकर्त्यांशी जवळिकीचे,मित्रत्वाचे,सोहार्दाचे संबंध होते.ते भारतीय राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा होते – अजित पवार


मी माझ्या मित्राला गमावले. राजीव सातव यांच्या जाण्याने आमचे अपरिमित नुकसान झाले आहे. काँग्रेसच्या आदर्शाना प्रत्यक्षात उतरवणारे नेते होते. त्यांच्याकडे प्रचंड क्षमता होती. त्यांच्या जाण्याने सर्वांचे फार मोठे नुकसान झाले आहे – राहुल गांधी


माझे अत्यंत जवळचे सहकारी खा.राजीव सातव यांच्या अकाली निधन हा देशातील पुरोगामी, निधर्मी चळवळीला मोठा धक्का आहे. त्यांचे कुटुंबीय आणि सहकाऱ्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. – डॉ. जितेंद्र आव्हाड


तोक्ते चक्रीवादळाचे केंद्र गोवा किनारपट्टीपासून १०० किमीहून कमी अंतरावर आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला वादळवाऱ्यासह लाटांचा तडाखा बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचं वयाच्या ४६ व्या वर्षी निधन झालं. गेले काही दिवस ते कोरोनाविरुद्ध झुंज देत होते. २३ दिवस व्हेंटिलेटरवर होते.(सविस्तर वाचा )


तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोकणासह मुंबईच्या काही भागात विजांच्या कडकडासह पावसाने हजेरी लावली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही पावसासह वाऱ्याचा वेगही वाढला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -