Live Update: महाराष्ट्रातील लॉकडाऊन 30 मे पर्यंत वाढवण्याचे संकेत, अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार

News Live Update

महाराष्ट्रातील लॉकडाऊन 30 मे पर्यंत वाढवण्याचे संकेत, अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार


राज्यात ऑक्सिजन निर्मितीसाठी 1100 कोटी रुपयांची तरतूद केली जाणार, येत्या मंत्रीमंडळ बैठकीत प्रस्तावाला मिळणार मंजुरी


बाळासाहेब थोरात शरद पवारांचा भेटीला


मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना फ्रंट लाईन वर्कर म्हणून घोषित केल्याने आता मंत्रालयातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण होणार आहे, मंत्रालयात 12 ते 25 मे पर्यंत कामकाजाच्या वेळेत सकाळी 10 ते 5 या वेळेत होणार लसीकरण, लसीकरणासाठी खास कॅम्प आयोजित करण्यात येणार


५वी ते ८वी शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी आज जाहीर केले आहे. यामुळे विद्यार्थी, शिक्षक, पालक यांना मोठा दिलासा मिळेल, अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली आहे.


जनता दलाचे माजी अध्यक्ष आणि बारामती लोकसभा मतदार संघाचे खासदार संभाजीराव काकडे उर्फ लाला यांचे आज निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. शरद पवार यांचे कट्टर विरोधक अशी संभाजीराव काकडे यांची ओळख होती.


सिंगापूरहून निघालेले INS ऐरावत जहाज ८ क्रायोजेनिक ऑक्सिजन टॅक घेऊन विशाखापट्टणम येथे दाखल झाले आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या कठीण काळात लागणाऱ्या वैद्यकीय वस्तू आणि ३ हजार ८९८ ऑक्सिजन सिलेंडर घेऊन हे जहाज सिंगापूरहून विशाखापट्टणमला दाखल झाले आहे. ५ मे रोजी हे जहाज सिंगापूरहून निघाले होते.


पुदुचेरीचे नवीन मुख्यमंत्री एन रंगास्वामी यांना कोरोनाची लागण झाली आहे. पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला कौल मिळाल्यानंतर एन . रंगास्वामी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. रंगास्वामी यांना चेन्नईच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावर बोरघाटात आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास चार वाहनांची एकमेकांना धडक लागून अपघात झाला. मुंबईच्या दिशेने येणारा गॅस टँकर, टेम्पो,ट्रेलरचा अपघात झाल्याने गॅस टँकर रस्त्यात पलटी झाला. या अपघातामुळे बोरघाटात मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. गॅस टँकरमधून प्रोपिलीन गॅसची गळती सुरू झाल्याने अग्निशमन दलालाच्या जवानांना तात्काळ घटनास्थळी बोलावण्यात आले.


देशात ३ लाख ६६ हजार १६१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर ३ लाख ५३ हजार ८१८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर ३ हजार ७५४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


पेट्रोल डिझेलच्या दरात आजही वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत ९७.८६ रुपये इतकी आहे. तर डिझेलची किंमत ८९.१७ रुपये आहे.


IAF इंडोनेशियातून 4 ऑक्सिजन कंटेनर भारतात दाखल झाले आहेत.


सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या सुमोटो याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. ऑक्सिजन पुरवठा, औषध पुरवठा आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत होणार्‍या आजारासंबंधीच्या धोरणांबाबत सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे.