घरताज्या घडामोडीअदानी पोर्टविरोधात मुरुड तालुक्यात स्थानिकांचे काम बंद आंदोलन

अदानी पोर्टविरोधात मुरुड तालुक्यात स्थानिकांचे काम बंद आंदोलन

Subscribe

स्थानिकांना प्रशिक्षण व रोजगार मिळावा यासाठी स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांनी ग्रामस्थांसह अदानी पोर्टचे एच. आर. कॅप्टन लोबो यांची भेट घेऊन काम बंद करण्यास भाग पाडले.

मुरुड तालुक्यातील आगरदांडा येथील अदानी पोर्टच्या कामात स्थानिकांना डावलणे, स्थानिक ठेकेदारांची देणी थकविणे, वर्कऑर्डर देऊनही वाहने बंद करण्याची देण्यात आलेली नोटीस, तसेच सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती असताना देखील कंपनीने काम सुरू ठेवल्याने स्थानिकांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. स्थानिकांनी रोजगारासाठी बँकेचे कर्ज काढून बस, इनोव्हा, बोलेरो, पीकअपसारखी वाहने घेऊन भाड्याने लावल्या आहेत. या गाड्यांना एक वर्षाची वर्कऑर्डर देऊनही ती बंद करण्याची नोटीस अदानी पोर्टतर्फे नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे चालक आणि मालकांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिकांना प्रशिक्षण व रोजगार मिळावा यासाठी स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांनी ग्रामस्थांसह अदानी पोर्टचे एच. आर. कॅप्टन लोबो यांची भेट घेऊन काम बंद करण्यास भाग पाडले.

आगरदांडा येथील काम सुरुच 

अदानी पोर्टच्या कामाला सुरुवात झाली. मात्र या कामात स्थानिकांना डावलून बाहेरील ठेकेदाराला काम दिले जाते. मागील दिघी पोर्टच्या कामात डीबीएम आणि डीपीएल कंपनीकडून अद्यापही काही ठेकेदारांची येणे बाकी आहे. न्यायालयाची स्थगिती असताना देखील कंपनीचे काम सुरू आहे. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख ऋषिकांत डोंगरीकर, उप तालुकाप्रमुख मनोज कमाने, महिला संघटक शुभांगी करडे, मुरुडच्या नगराध्यक्षा स्नेहा पाटील, सरपंच वृषाली डोंगरीकर, कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित होते.

- Advertisement -

हे ही वाचा – सिटी बँक कथित घोटाळ्याप्रकरणी सेनेचे माजी खासदार अडसूळ यांच्यासह मुलाला ईडीचं समन्स


 

- Advertisement -

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -