घरCORONA UPDATECorona Live Update: राज्यात कोरोनाचे १ हजार ६०६ नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा...

Corona Live Update: राज्यात कोरोनाचे १ हजार ६०६ नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा ३० हजारपार!

Subscribe
राज्यात आज कोरोनाचे १ हजार ६०६ नवे रुग्ण आढळले असून एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३० हजार ७०६वर पोहोचला आहे. तर आज राज्यात कोरोनामुळे ६७ जणांचे बळी गेले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा १ हजार १३५ झाला आहे. दिलास देणारी बाब म्हणजे राज्यात आज ५२४ कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे एकूण कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा आकडा ७ हजार ८८ झाला आहे.

मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील मृतांचा आकडा ६९६वर पोहोचला आहे. आज मुंबईत ८८४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १८ हजार ३९६ झाला आहे.


कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात शनिवारी सर्वाधिक नवीन ३५ रुग्णांची भर पडली, तर एकाच मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या ४५९ झाली आहे. तर आतापर्यंत १० जणांना मृत्यू झाला आहे. महापालिका क्षेत्रात दिवसागणिक रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये कल्याण पश्चिमेत ७ रुग्ण,  कल्याण पूर्वमध्ये १४ डोंबिवली पश्चिमेत ८ रुग्ण,  डोंबिवली पूर्वेत ३ आणि टिटवाळ्यात ३ रुग्णांचा समावेश आहे. विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या  २७२ असून, त्यापैकी महापालिकेच्या रुग्णालयात भरती करण्यात आलेल्या रुग्णाची संख्या २२८ आहे. आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या १७७ आहे.

मुंबईत धारावीमध्ये आज ५३ नवे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे धारावीतील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा १ हजार १९८वर पोहोचला आहे.

- Advertisement -

माहिममधील कोरोनाबाधितांचा आकडा १८७वर!

माहिममध्ये कोरोनाच्या ११ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे माहिम मधील एकूण कोरोबाधितांचा आकडा १८७वर पोहोचला आहे.

दादरमधील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा १५४वर!

दादरमध्ये आज कोरोनाचे चार नवे रुग्ण आढळले आहे. त्यामुळे दादरमधील कोरोनाबाधितांचा आकडा १५४वर पोहोचला आहे.

- Advertisement -

आत्मनिर्भर भारत उद्दीष्ट साध्य करण्यासाठी गुंतवणूकीत गती वाढविण्यासाठी धोरणात सुधारणा करण्यात आल्या आहेत.


नवीन गुंतवणूक वाढण्याकरिता राज्यांमध्ये रॅकिंग केले जाणार आहे.


तसंच अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, बऱ्याच क्षेत्रांना सुलभ धोरणांची आवश्यकता आहे. बँकांवर कोणालाही कर्ज देण्यासाठी दबाव नाही.


कठीण स्पर्धेसाठी तयार राहिल पाहिजे. आम्ही सिस्टीम संबंधित मोठ्या सुधारणा केल्या आहे. यामध्ये जीएसटी, आयबीसी, इज ऑफ डूइंग बिझनेस, वीज क्षेत्राशी संबंधित सुधारणा, कर क्षेत्राशी संबंधित सुधारणा इत्यादी संबंधित सुधारणा केल्या आहेत. – निर्मला सीतारमण


आत्मनिर्भर पॅकेजद्वारे भारताला सक्षम बनवायचं आहे. – निर्मला सीतारमण


आपल्याला कठीण परिस्थितीशी सामना करायचा आहे. – निर्मला सीतारमण


पत्रकार परिषदेच्या सुरुवातील पुरवाठ्याचे महत्त्व निर्मला सीतारमण यांनी सांगितले. त्यानंतर बँकिंग क्षेत्रात सुधारणा केल्याचे सांगितले.


अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची पत्रकार परिषद सुरू झाली आहे. या परिषदेत आर्थिक पॅकेजसंबंधी आज नव्या घोषणा करण्यात येणार आहे.


आतापर्यंत १३५ बीएसएफ कोरोना पॉझिटिव्ह जवान रिकव्हर झाले असल्याची माहिती समोर आली आहे. तसंच गेल्या २४ तासांत १६ बीएसएफचे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाने दिली आहे.


आतापर्यंत राज्यात १ हजार १४० पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये ८६२ सक्रिय असून, २६८ रिकव्हर झाले आहेत. तर कोरोनामुळे एकूण १० पोलिसांचा बळी गेला आहे, अशी माहितील महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे.


उत्तर प्रदेशमधील बांदा येथे ट्रक पलटी झाल्यामुळे पाच प्रवासी मजुरांची मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हे मजूर महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशकडे परतत होते, अशी माहिती एएसपी प्रवीण भूरिया यांनी दिली आहे.


ही सरकारवर टीका करण्याची वेळे नाही आहे. सरकारने मजुरांची मदत करणे गरजेचे आहे. – राहुल गांधी


मागणी आणि पुरवठा या दोन्ही गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. मागणी आणि पुरवठा सुधारण्यासाठी पैसा देणे गरजेचे आहे.  – राहुल गांधी


कोरोनामुळे सर्वात जास्त आर्थिक नुकसान होणार – राहुल गांधी


लॉकडाऊन सावधगिरीने शिथिल करणे गरजे आहे – राहुल गांधी


राजकारण करायचे नाही पण सरकारने पॅकेज बदलायला हवे, असे राहुल गांधी म्हणाले.


आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळेस ते म्हणाले की, कोरोनामुळे देश मोठ्या संकटातून जातोय. सरकारने जाहीर केलेले पॅकेज हे कर्जाच्या स्वरुपात देऊ नका. थेट शेतकऱ्यांच्या आणि मजुरांचा हाताता पैसे द्या, अशी मागणी त्यांनी सरकारला केली.


शाहूनगर पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक हे ताप व सर्दी यामुळे आजारी होते व त्यांनी रुग्णनिवेदन केले होते आणि घरीच होते. त्यांची सायन रुग्णालय येथे १३ मेला कोरोना ची चाचणी केली होती आणि त्याचा रिपोर्ट आज रोजी पॉझिटिव्ह आलेला आहे, मात्र आज  पहाटेच त्यांचे राहत्या घरी निघन झाले.


बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करा… मुंबईकरांचे जीव वाचविणारे योद्धे म्हणून बेस्ट कर्मचारी आता स्वतःसाठी लढतायेत… तर त्याचं ऐकायला हवं! त्यांच्या जीविताच्या रक्षणाची हमी महापालिकेने घ्यायलाच हवी! त्यांच्या मागण्या मान्य करा, अन्यथा आम्हांलाही त्यांच्या आंदोलनात मानवतेच्या भावनेतून उतरावं लागेल!


सोलापुरात आज सकाळी नवे १७ करोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. यात दहा पुरूष व सात महिला आहेत. यामुळे सोलापुरातील एकूण रूग्णसंख्या ३६० वर पोहोचली आहे. आतापर्यंत करोनाने घेतलेल्या बळींची संख्या २४ इतकी झाली आहे. तर करोनामुक्त झालेल्यांची संख्या ११३ झाली आहे.


अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा दर्शवला आहे. तसेच करोनाविरुद्धच्या लढ्यासाठी भारताला व्हेंटिलेटर्सचा पुरवठा करणार असल्याचेही सांगितले आहे.


घराकडे निघालेल्या २३ मजुरांचा उत्तर प्रदेशमधील औरैयामध्ये झालेल्या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या या अपघातामध्ये दोन ट्रकचा भीषण अपघात झाला. यापैकी एका ट्रकमध्ये ८१ मजूर असल्याचे सांगितले जात आहे. त्यापैकी २३ मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून १५ ते २० जण गंभीर जखमी झाले आहेत.


देशातील कोरोना रुग्णांचा आकडा ८१ हजारहून अधिक झाला आहे.  शुक्रवारी तो ८१,९७० इतका होता.  चोवीस तासांमध्ये ३,९६७ नव्या रुग्णांची भर पडली तर १०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यू २,६४९ झाले आहेत. एकूण २७,९२० रुग्ण बरे झाले आहेत.  मुंबईत शुक्रवारी मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आज तब्बल ९३३ रुग्णांची मुंबईत नोंद झाली. तर आज ३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -