लॉकडाऊनमुळे कमाई झाली बंद, बायको आणि मेहुण्याने नवऱ्याचं डोकंच फोडलं

lockdown Man beaten up by wife and brother for job lost
लॉकडाऊनमुळे कमाई झाली बंद, बायको आणि मेहुण्याने नवऱ्याचं डोकंच फोडलं

कोरोनाच्या काळात अनेक धक्कादायक आणि विचित्र घटना घडल्याच्या समोर आल्या आहेत. कोरोनामुळे लॉकडाऊन झाला आणि त्यानंतरपासून अनेक जणांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, तर काही जण अर्ध्या पगारात काम करत आहेत. पण यामुळे एका नवऱ्याला बायको आणि मेहुण्याने मारहणा केल्याचे समोर आले आहे. बिहारमधील छपरा शहरातील करीम चकमध्ये लॉकडाऊनमध्ये कमाई न झाल्यामुळे बायकोने आपल्या भावासोबत मिळून आपल्या नवऱ्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीमुळे नवऱ्या गंभीररित्या जखमी झाला. कसं बसं त्याच्या भाच्याने जवळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.

याबाबत नवरा सांगितलं की, या दिवसात लॉकडाऊनमुळे त्याची कमाई झाली नाही. तो चप्पलांच्या दुकानात नोकरी करत होता. परंतु आता त्याची नोकरी गेली. यादरम्यान बायको सतत त्याच्या पैशांची मागणी करत होता. पण तो बायकोची ही मागणी पूर्ण करू शकत नव्हता. फक्त याच कारणामुळे बायकोने आपल्या भावासोबत मिळून काठीने नवऱ्याला मारहाण केली. यात नवऱ्याचे डोकं फोटलं गेलं. अनेक ठिकाणी जखम झाली. कपडे रक्ताने माखले होते.

एवढं सगळं होऊनही नवऱ्याने पोलिसात धाव घेतली नाही. घरगुती प्रकरण असल्यामुळे नवऱ्याने आपल्या बायको आणि मेहुण्याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली नाही.


हेही वाचा – अरे बापरे! आता सासऱ्याने सूनेसोबत बांधली लग्नगाठ, मुलाने घेतली पोलिसात धाव