Magh Month 2022: माघ महिन्यात का केले जाते गंगा स्नान? काय आहे महत्त्व आणि पौराणिक कथा?

या महिन्यात दान करणे, स्नान, उपवास आणि तप करायला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे माघ महिन्यात लोक हरिद्वार आणि प्रयागराज सारख्या धार्मिक स्थळांवर गंगा स्नान (gagna snan)  करण्यासाठी जातात.

Magh Month 2022: Importance of gagna snan in magh month, what is the significance and myth?
Magh Month 2022: माघ महिन्यात का केले जाते गंगा स्नान? काय आहे महत्त्व आणि पौराणिक कथा?

हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याचे आपले असे विशिष्ट महत्त्व आहे. हिंदू कॅलेंडरनुसार पौष पौर्णिमेनंतर माघ महिना (Magh Month 2022)  येतो. हिंदू धर्मात माघ महिना हा पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात दान करणे, स्नान, उपवास आणि तप करायला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे माघ महिन्यात लोक हरिद्वार आणि प्रयागराज सारख्या धार्मिक स्थळांवर गंगा स्नान (gagna snan)  करण्यासाठी जातात. गंगा स्नानाला या महिन्यात विशेष महत्त्व आहे. काय आहे यामागचे कारण हे जाणून घेण्यासाठी यामागची कथा जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

गंगा स्नानाची पौराणिक कथा

 

17 जानेवारीला पौष पौर्णिमेनंतर 18 जानेवारीला माघ महिना सुरू होत आहे. माघ महिना 16 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. पौराणिक कथेनुसार, माघ महिन्यात इंद्र देवाला गौतम ऋषींनी श्राप दिला होता. आपल्या चुकीची जाणीव झाल्यानंतर इंद्र देवांनी गौतम ऋषींंची माफी मागितली. त्यानंतर गौमत ऋषींनी माघ महिन्यात गंगेत स्नान कर. याने तुला तुझ्या चूकीचे प्रायश्चित्त मिळेल. तेव्हापासून माघ महिन्यात गंगेत स्नान करण्याची पद्धत सुरू झाली. गंगेत स्नान केल्याने श्रापातून आपली मुक्ती होते असे म्हटले जाते. त्यामुळे माघ पौर्णिमा आणि माघ अमावस्येला गंगा स्नानाला फार महत्त्व आहे.

माघ महिन्यात दानाला महत्त्व

शास्रानुसार, माघ महिन्यात तिळ, गुळ आणि चादर यासारख्या वस्तू दान करण्याला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की, दान केल्याने माणसाच्या शरिरात असलेल्या रोगांचा नाश होतो. सुती कपडे, चटई, चप्पल यासारख्या वस्तूंचे दान करणेही शुभ मानले जाते. याने धन धान्याची प्राप्ती होते. मत्स्य पुराणानुसार, माघ महिन्यात ब्रम्हवैवर्त पुराणाचे दान करावे. याने ब्रम्ह लोकाची प्राप्ती होते. त्याचप्रमाणे माघ महिन्यात अन्न दान केल्याने कधीच धनाची कमतरता जाणवत नाही.


हेही वाचा – Vastu Tips:घरात या दिशेला चुकूनही लावू नका कॅलेंडर