घरताज्या घडामोडीनवी मुंबई वाहतूक विभागाचे महा ट्रॅफिक अ‍ॅप

नवी मुंबई वाहतूक विभागाचे महा ट्रॅफिक अ‍ॅप

Subscribe

वाहतुकीचे नियम मोडणार्‍यांची आता सुटका नाही, होणार ऑनलाईन दंड आकारणी

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ई चलानच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई होऊन देखील दंडाची रक्कम थकविलेल्या वाहन चालकांकडून आता ऑनलाईन दंड वसुलीची मोहीम सुरु करण्यात येणार आहे. नवी मुंबई वाहतूक विभागाकडून यासाठी महा ट्रॅफिक अ‍ॅप सुरु करण्यात आले असल्याची माहिती नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उपयुक्त पुरूषोत्तम कराड यांनी दिली. महा ट्रॅफिक अ‍ॅप डाऊनलोड करून त्याद्वारे आपल्या वाहनावर काही चलान आहे का, याची खात्री करावी, असे आवाहन देखील कराड यांनी नवी मुंबईकरांना केले आहे.

वन स्टेट वन चलान अंतर्गत ई चलान व्यवस्था सुरु करण्यात आली आहे. तेव्हापासून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाअंतर्गत ई चलान सुरु करण्यात आले आहे. वाहतूक विभागामार्फत फक्त ई चलान मार्फत कारवाई करण्यात येते. ज्यांच्यावर कारवाई केली जाते त्यांना दंडात्मक रक्कम नंतर भरणा करण्याची सुविधा आहे. वाहतुकीचे नियोजन आणि वाहन चालकांवर शिस्त राहणे, यासाठी वाहनधारकांनी कारवाईचा दंड भरणे आवश्यक आहे. मात्र, वाहन चालक ई चलनाचे पैसे भरण्यास विलंब लावत आहेत. त्यामुळे दंडाची रक्कम मोठ्या प्रमाणात थकीत झाली आहे.

- Advertisement -

त्यामुळे नवी मुंबई वाहतूक विभागाकडून दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी नागरिकांनी ई चलनाचे महा ट्रॅफिक अ‍ॅप डाऊनलोड करावे. याद्वारे आपल्या वाहनावर काही चलान आहे का, याची खात्री करावी. चलान प्रलंबित असल्यास आपल्या वाहनावरील दंडाची रक्कम जवळच्या वाहतूक शाखेत भरून नवी मुंबई वाहतूक विभागास सहकार्य करावे, असे आवाहन कराड यांनी केले आहे. अन्यथा जाणीवपूर्वक दंडाची रक्कम थकविण्यावर कठोर कारवाई करण्याचे संकेत नवी मुंबई वाहतूक विभागातर्फे देण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -