घरताज्या घडामोडीMahad Fire : महाड एमआयडीसीमध्ये रासायनिक कारखान्याला भीषण आग; जीवितहानी टळली!

Mahad Fire : महाड एमआयडीसीमध्ये रासायनिक कारखान्याला भीषण आग; जीवितहानी टळली!

Subscribe

महाड एमआयडीसीमधील प्लॉट सी मध्ये असलेल्या प्रदीप शेटे या रासायनिक कंपनीला बुधवारी रात्री 7:30 वाजता भीषण आग लागली. आग लागली त्या दरम्यान करखान्यात जवळपास सात कामगार काम करत होते.

महाड (रायगड) : महाड औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या प्रदीप शेट्ये या रासायनिक कारखान्याला आज बुधवारी (7 फेब्रुवारी) रात्री 7.30 वाजता भीषण आग लागली. लागलेल्या आगीमध्ये कारखाना जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे. (Mahad Fire Fire breaks out at chemical factory in Mahad MIDC Loss of life avoided)

महाड एमआयडीसीमधील प्लॉट सी मध्ये असलेल्या प्रदीप शेटे या रासायनिक कंपनीला बुधवारी रात्री 7:30 वाजता भीषण आग लागली. आग लागली त्या दरम्यान करखान्यात जवळपास सात कामगार काम करत होते. आग लागताच कारखान्यातील कामगार बाहेर पडले. त्यामुळे जिवीतहानी टळळी. मात्र या आगीमध्ये कारखाना पूर्णपणे जळून खाक झाला आहे. महाड एमआयडीसी आणि महाड नगरपालिका यांच्या अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले.

- Advertisement -

कारखान्यामध्ये हायड्रोजन वायूचे भरलेले ड्रम महाड औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक पथकाने तत्काळ हटवले. घटनास्थळी पोलिस उपवभागीय अधिकारी शंकर काळे, महाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे अधिकारी मारुती आंधळे, उपविभागीय अधिकारी ज्ञानोबा बानापुरे, तहसीलदार शितोळे यांनी धाव घेऊन आग आटोक्यात आणणाऱ्या यंत्रणांना वेग आणला.

हेही वाचा : Sharad Pawar : शरद पवारांची एस काँग्रेस ते राष्ट्रवादी- शरदचंद्र पवार पक्षापर्यंतची वाटचाल

- Advertisement -

शेट्ये या रासायनिक कारखान्यात जनावरांसाठी लागणारे औषधसाठी घटक बनवले जातात. या कारखान्यांमध्ये नियमावली धाब्यावर बसवले जात असल्याने यापूर्वी देखील अपघात होऊन जीवितहानी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र तरी देखील संबंधित विभागाकडून या कंपनीला अभय दिले जात असल्याने कंपनी मालकाकडून सुरक्षा विषयी कोणती उपाययोजना केली जात नाही.

हेही वाचा : Mithi River : मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प; मलजल बोगद्याच्या दुसऱ्या टप्प्याचा ‘ब्रेक-थ्रू’ यशस्वी

याआधीही लागली होती आग

रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसीतील केमिकल कंपनीत 3 नोव्हेंबर रोजी भीषण आग लागली होती. यामध्ये कामगारांचा मृत्यू झाला होता. महाडमधील ब्लू जेट केमिकल कंपनीत ही आग लागली होती. गॅस गळतीमुळे आधी स्फोट आणि नंतर आग भडकल्याची माहिती समोर आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -