शॉक लागून महानगर गॅस कंत्राटी कर्मचारी जखमी; चेहऱ्याला व डाव्या हाताला दुखापत

महानगर गॅसचे कंत्राटी कर्मचारी शॉक लागून जखमी झाल्याची घटना ठाण्यात घडली. विनय कुमार (22) असं या महानगर गॅसचे कंत्राटी कर्मचाऱ्याचे नाव आहे. जखमी विनय कुमार याला तातडीने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

महानगर गॅसचे कंत्राटी कर्मचारी शॉक लागून जखमी झाल्याची घटना ठाण्यात घडली. विनय कुमार (22) असं या महानगर गॅसचे कंत्राटी कर्मचाऱ्याचे नाव आहे. जखमी विनय कुमार याला तातडीने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्याच्या चेहऱ्याला व डाव्या हाताला दुखापत झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

गुरुवारी सकाळी 11:15 वाजण्याच्या सुमारास समोर आली आहे. ठाण्याच्या चंदनवाडीत महानगर गॅस वाहिनीचे काम ठेकेदार तसलीम खान यांच्यामार्फत सुरू आहे. रोड ब्रेकरच्या सहाय्याने करत असताना महावितरणची लाईन कट होऊन स्पार्क झाले. यावेळी महानगर गॅसचे कंत्राटी कर्मचारी विनय कुमार हे काम करत असताना त्यांना त्याचा शॉक लागला आणि ते जखमी झाले.

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी महानगर गॅस अधिकारी व कर्मचारी, महावितरण कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवानांनी धाव घेतली. तसेच जखमी विनय कुमार याला तातडीने रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.

विनय हा कळवा पूर्व, भास्कर नगर येथील रहिवासी असून त्यांच्या चेहर्‍याला व डाव्या हाताला दुखापत झाली आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अविनाश सावंत यांनी दिली.


हेही वाचा – जिथे राज ठाकरेंची सभा तिथेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सभा; परवानगीवरून वादाची शक्यता