घरताज्या घडामोडीLakhimpur Kheri violence: लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ उरणमध्ये 'महाराष्ट्र बंद' ची हाक

Lakhimpur Kheri violence: लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ उरणमध्ये ‘महाराष्ट्र बंद’ ची हाक

Subscribe

उरण तालुक्यात अत्यावश्यक सेवा वगळून हा बंद कडकडीत पाळण्यात येणार

उत्तरप्रदेश मधील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून मारण्याच्या घटनेचे पडसाद संपूर्ण देशात पाहायला मिळाले. या घटनेच्या विरोधात महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात त्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या बैठका, नियोजन सूरू असून उरणमध्येही महाविकास आघाडीच्या प्रमुख नेते, पदाधिकारी कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या उरण शहर कार्यालयात संपन्न झाली. बैठकीमध्ये महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी ११ ऑक्टोबरला राज्यव्यापी बंद मध्ये सहभागी होण्याचा एकमुखी निर्णय घेतला. तसेच यावेळी उत्तर प्रदेश मधील लखीमपूरला शेतकऱ्यांना चिरडून मारणाऱ्या केंद्र सरकार व योगी सरकारचा यावेळी निषेध करण्यात आला.

११ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी ७ या वेळेत होणाऱ्या बंद मध्ये संपूर्ण उरण तालुक्यात अत्यावश्यक सेवा वगळून हा बंद कडकडीत पाळण्यात येणार असल्याची माहिती उपस्थितांनी दिली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रशांत पाटील, शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख मनोहरशेठ भोईर, काँग्रेस रायगड जिल्हा उपाध्यक्ष -मिलिंद पाडगावकर,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जे डी जोशी,शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस मेघनाथ तांडेल या महाविकास आघाडीच्या नेत्यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

हे ही वाचा – Lakhimpur violence: व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपद्वारे रचला लखीमपूर हिंसेचा प्लॅन? चॅटमध्ये आढळल्या ‘या’ गोष्टी


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -