नारायण राणे यांच्यावर मंत्रोच्चारात औक्षण करण्यात येत आहे. राणेंची जनआशीर्वाद यात्रा कुणकेश्वर पर्यंत पोहचली असून त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी मंत्रोच्चार करण्यात येत आहे. ढोल ताशांच्या गजरात राणेंचे स्वागत करण्यात आले.
खासदार सुप्रिया सुळे आज नागपूर दौऱ्यावर असणार आहेत. राष्ट्रवादीची आज नागपुरात संघटनात्मक बैठक होणार आहे.
सिंधुदुर्गातील जमावबंदी राजकीय आहे असा आरोप भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री असहिष्णूतेचे जनक आहेत असे म्हणत आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे.
देशात गेल्या २४ तासात ४६,७५९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली असून, ५०९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ३१,३७४ रुग्ण बरे होऊन सुखरुप घरी परतले आहेत. गेल्या २४ तासात देशात १ कोटी ३ लाख ३५ हजार २९० जणांचे लसीकरण झाले आहे.
India reports 46,759 new #COVID19 cases, 31,374 recoveries and 509 deaths in the last 24 hrs, as per Health Ministry.
Total cases: 3,26,49,947
Total recoveries: 3,18,52,802
Active cases: 3,59,775
Death toll: 4,37,370Total vaccinated: 62,29,89,134 (1,03,35,290 in last 24 hours) pic.twitter.com/6Hxp7d1Td5
— ANI (@ANI) August 28, 2021
खासदार सुप्रिया सुळे आज नागपूर दौऱ्यावर
सरकारने परवानगी दिली त्याचे स्वागत पण नाही तरी आम्ही दहीहंडी करणारच अशी टीका राम कदम यांनी सरकारव केली आहे. घरात बसून हिंदूनी काय करावे आणि काय नाही या फुकटच्या सलल्याची आम्हाला गरज नाही असा घाणाघत राम कदम यांनी केला आहे.
महाराष्ट्र सरकार ने नियम आखून परवानगी दिली स्वागत… अन नाही दिली तरी आम्ही श्री कृष्ण जन्माचा सोहळा #दहीहंडी करणारच . हिंदू धर्माचे सण आम्ही साजरे करणारच . स्वतः घरात बसुन हिंदूनी काय करावे अन करू नये या फुकटच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही
— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) August 28, 2021
नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा सिंधुदुर्गात दाखल
राज्यातील ४ जिल्हा बँकांच्या निवडणूका ७ महिन्यांनी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. नाशिक,सोलापूर,नागपूर,बुलढाणा जिल्हा बँकेच्या निवडणूक ३१ मार्च २०२२ नंतर होणार आहेत.
शिवसेना खासदार संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर आहेत. दुपारी १२ वाजता ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.