घरताज्या घडामोडीLive Update: राज्यात आज दिवसभरात ३,०६३ नव्या रुग्णांची वाढ, ५६ जणांचा मृत्यू

Live Update: राज्यात आज दिवसभरात ३,०६३ नव्या रुग्णांची वाढ, ५६ जणांचा मृत्यू

Subscribe

राज्यात आज दिवसभरात ३ हजार ६३ नवे कोरोनाबाधित आढळले असून ५६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ६ हजार १९८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. महाराष्ट्रातील आता कोरोनाबाधितांची संख्या ६५ लाख ५० हजार ८५६वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ३९ हजार ६७ जणांचा मृत्यू झाला असून ६३ लाख ७१ हजार ७२८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात ३६ हजार ४८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


भारतातील कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची संख्या ८९ कोटींवर पोहोचले आहे. यामध्ये आज संध्याकाळी ७ पर्यंत ५८ लाखांहून अधिक डोस देण्यात आले आहेत, अशी माहिती सरकारने दिली आहे.

- Advertisement -


मुंबईत गेल्या २४ तासांत ४५८ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ४५८ जण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईतील आता कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख ४२ हजार ९९६वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १६ हजार ११० जणांचा मृत्यू झाला असून ७ लाख १९ हजार ६३२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत ४ हजार ७६१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -


पुण्यात आज, गुरुवारी दिवसभरात १८५ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर १३८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या १८४ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५ लाख १ हजार २६वर पोहोली आहे. यापैकी आतापर्यंत ९ हजार २९ जणांचा मृत्यू झाला असून ४ लाख ९० हजार ५१० जण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यातील सक्रीय रुग्णांची संख्या ९ हजार २९ इतकी आहे.


पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टर अमरिंदर सिंग यांनी मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, मी काँग्रेस पक्ष सोडणार आहे.


पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग दिल्ली विमानतळावर थोड्या वेळापूर्वी दाखल झाले होते. लवकरच ते पंजाबला रवाना होणार आहेत.


वांद्रे येथून एका संशयित आरोपीला एटीएसकडून अटक करण्यात आली असून यापूर्वी एटीएसने जोगेश्वरी येथून झाकीर शेख मुंब्रा येथुन रिजवान मोमीन याला अटक केली होती. मुंबईत एटीएसकडून करण्यात आलेली ही तिसरी अटक आहे.
दिल्ली येथे अटक करण्यात आलेल्या सहा अतिरेकी प्रकरणात ही अटक असल्याचे सांगण्यात येत असून  इरफान शेख असे अटक करण्यात आलेल्या संशयितांचे नाव आहे. त्याच्या घरातून काही साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.


आनंदराव अडसूळ यांना गोरेगावच्या SRV रुग्णालयात रुग्णालयात हलवण्यात आले असून ईडीचे अधिकारी तसेच शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहेत.  रवी राणा यांनी केलेल्या तक्रारीनंतर अडसूळांवर ईडीची कारवाई करण्यात आली त्यादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने ते मागील ४ दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत आहेत. गोरेगाव येथील लाईफ लाईन मेडिकेअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र आता त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.


दिवगंत अभिनेता सुशांत सिंहचा मित्र कुणाल जानीला NCBकडून अटक करण्यात आली असून NCBचे समीर वानखेडे यांनी ही कारवाई केली आहे. ड्रग्ज प्रकरणात NCB कडून ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कुणाल फरार होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. आज मुंबईतील खार परिसरातून कुणाल जानी याला NCB ने ताब्यात घेतले आहे.


आशिष शेलारांचा महापौरांवर पलटवार केलाय. २४ वर्षात २१ हजार कोटी खड्ड्यात घातले. आता धावते दौरे करुन काय उपयोग? असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे.


देशात गेल्या २४ तासात २३,५२९ नवे रुग्णांची नोंद करण्यात आली असून ३११ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर २८,७१८ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. देशात सध्या २,७७,०२० अँक्टिव्ह रुग्ण आहेत.


मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून पुणे दौऱ्यावर असणार आहेत. आज संध्याकाळी राज ठाकरे पुण्यात दाखल होणार आहेत. पुण्यात मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असून शनिवारी शाखाध्यक्षांचा मेळावा घेणार आहेत.


अनिल देशमुख प्रकरणात ईडीकडून गृहविभागाचे उपसचिव कैलाश गायकवाड यांना समन्स बजावण्यात आले असून चौकशीसाठी आजच हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


जायकवाडी धरणाचे २७ दरवाजे उघडले असून ८९ हजार ६०४ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जायकवाडी धरणाचे काल २ दरवाजे उघडण्यात आले होते तर आज धरणारे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदीलगतच्या गावांना प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.


गुलाब चक्रीवादळामुळे गेल्या ४-५ दिवसांपासून राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. मात्र राज्यात २-३ दिवसात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता असून मराठवाडा,मध्य,महाराष्ट्र,विदर्भ आणि कोकणातील काही भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -