घरताज्या घडामोडीLive Update: अभिनेता सलमान खान पोहचला शाहरुख खानच्या भेटीला

Live Update: अभिनेता सलमान खान पोहचला शाहरुख खानच्या भेटीला

Subscribe

अभिनेता सलमान खान बांद्रातील शाहरुख खानच्या घरी पोहचला आहे. आर्यन खानच्या अटकेनंतर सलमानने शाहरुखची भेट घेतली आहे.


न्यायालयाने ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला एनसीबी कोठडी दिली आहे. उद्यापर्यंत आर्यन खानला एनसीबी कोठडी देण्यात आली असून आजची रात्र आर्यनला कोठडीत घालवावी लागणार आहे. उद्या परत आर्यनला न्यायालयात हजर करण्यात येईल.

- Advertisement -

एनसीबीने आर्यन खानसह दोघांना किला कोर्टात केलं दाखल


‘तारक मेहता’ मालिकेतील ‘नट्टू काका’ (Nattu kaka) यांचे कॅन्सरमुळे निधन

- Advertisement -

आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात किला कोर्टात थोड्याच वेळात हजर करण्यात येणार (सविस्तर वाचा


विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा बीड दौरा रद्द झाला आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे आजारी असल्यामुळे हा दौरा रद्द करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.


एनसीबीकडून करण्यात आलेल्या ड्रग्ज कारवाईत बॉलिवूड अभिनेता शहारुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीकडून अटक करण्यात आली असून आर्यन खानला जे.जे. रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले आहे.  ड्रग्जचे सेवन करत असल्याची कबूली दिली आहे. आर्यन खानसह ४ जणांना अटक करण्यात आली आहे. (सविस्तर वृत्त थोड्याच वेळात) 


पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भवानीपूर पोटनिवडणुकांमध्ये५८ हजारांहून अधिक मतांनी विजय झाला आहे. भाजपच्या प्रियंका टिबरेवाल यांचा त्यांनी पराभव केला आहे.


भवानीपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या २०व्या फेरीला सुरुवात झाली असून ममता बॅनर्जी ५६,३८८ मतांच्या फरकाने भाजपच्या प्रियंका तिब्रेवाल यांच्या पुढे आहेत.


NCB ची नवी मुंबईत बेलापूरमध्ये छापेमारी केली असून क्रूज ड्रग्ज पार्टीमध्ये आरोपींच्या चौकशी दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार एनसीबीने ही धाड टाकली आहे.


भवानीपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या ११व्या फेरीची मतमोजणी सुरू आहे.  मतमोजणीनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ३४,००० मतांनी आघाडीवर आहेत.


भवानीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत टीएमसीची आघाडी वर आहे. ममता बॅनर्जींच्या समर्थकांनी त्यांच्या कोलकत्ता येथील निवास्थानाबाहेर जल्लोष साजरा करत आहेत.


ड्रग्ज प्रकरणी दिल्लीतील बड्या उद्योगपतींच्या मुली NCBच्या ताब्यात घेण्यात आले आहे. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या शिपवरुन प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या मुलासह १० जणांना अटक करण्यात आली आहे.

 


बंगाल विधानसभेच्या ३ जागांसाठी मतमोजणीची तिसरी फेरी सुरू झाली असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी २८०० मतांनी आघाडीवर आहेत. टीएमसी शमशेर गंज आणि जंगीपूर येथूनही आघाडीवर आहे.


बंगाल विधानसभेच्या ३ जागांसाठी मतमोजणी सुरू झाली असून ममत बॅनर्जी या भवानीपूरमध्ये पुढे आहेत.


मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका शिपवर एनसीपीने धाड टाकली. या शिपवर ड्रग्स पार्टी होणार असल्याची माहिती एनसीबीला मिळाली. एनसीबीच्या काही अधिकाऱ्यांनी प्रवासी बनून शिपमध्ये प्रवास केला आणि शिपवरून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आले.  एका बॉलिवूड सुपरस्टारच्या मुलाला या ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने ताब्यात घेतले आहे. अभिनेत्याच्या मुलाची कोणतीही माहिती एनसीबीकडून देण्यात आलेली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -