घरताज्या घडामोडीLive Update: देशभरात आज १ कोटी लसीकरण पार पडले, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती

Live Update: देशभरात आज १ कोटी लसीकरण पार पडले, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती

Subscribe

देशभरात आज दिवसभरात १ कोटी लसीकरण पार पडले. असे देशात पाचव्यांदा घडले आहे, असी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे.

- Advertisement -

राज्यात गेल्या २४ तासांत २ हजार ४३२ नव्या रुग्णांची वाढ झाली असून ३२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच आज दिवसभरात २ हजार ८१५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ६५ लाख ४१ हजार ७६२वर पोहोचली असून १ लाख ३८ हजार ९०२ जण मृत्यूमुखी पडले आहेत. तर ६३ लाख ६२ हजार २४८ जण कोरोनामुक्त झाले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.२६ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.


मुंबईत गेल्या २४ तासांत ३७७ नवे कोरोनाबाधित आढळले असून ७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच ३३४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या मुंबईत ४ हजार ७०२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -


२४ ऑक्टोबरला आरोग्य विभागाच्या गट ‘क’ची परीक्षा होणार अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. सविस्तर वाचा 


प्राप्तिकर विभागाने 23-सप्टेंबर 2021 रोजी महाराष्ट्रातील जालना स्थित चार मोठ्या स्टील रोलिंग कारखान्यांच्या एका समूहाशी संबंधित विविध स्थळांवर छापे आणि जप्तीची कारवाई केली. या सर्व कंपन्या स्टीलचे टीएमटी बार्स आणि बिलेट्स म्हणजेच छर्रे बनवण्याच्या उद्योगात आहेत. जालना, औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि कोलकाता या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली.

या कारवाई दरम्यान, अधिकाऱ्यांना गैरव्यवहारांना दुजोरा देऊ शकतील असे पुरावे असलेले असलेली अनेक कागदपत्रे, सुटे कागद आणि इतर डिजिटल पुरावे सापडले  असून हे सर्व पुरावे जप्त करण्यात आले आहेत. या कागदपत्रांवरुन या कंपन्या खूप मोठ्या बेहिशेबी आर्थिक व्यवहारात गुंतल्या असल्याचे स्पष्ट होत आहे. यातील अनेक व्यवहारांची कुठल्याही अधिकृत कागदपत्रांवर नोंद नाही. या ठिकाणी आढळलेल्या इतर पुराव्यांनुसार, या कंपन्यांनी बनावट कंपन्या आणि शेयर प्रीमियमच्या माध्यमातून केलेला बऱ्याच मोठ्या बेहिशेबी रकमेचा गैरव्यवहार देखील समोर आला आहे. सुमारे 200 कोटी रुपयांची अतिरिक्त खरेदी लक्षात आली असून, हिशेब नसलेला बराच मोठा मालही कारखाना परिसरात सापडला आहे.

12 बँक लॉकर्स उघडकीस आणले गेले. त्याशिवाय, 2.10 कोटी रुपयांची बेहिशेबी रोख रक्कम, 1.07 कोटी रुपयांचे दागिने देखील जप्त करण्यात आले आहेत. आतापर्यंत मिळालेल्या पुराव्यांनुसार 300 कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याची बेहिशेबी मालमत्ता समोर आली असून चार कंपन्यांचे 71 कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न असल्याचेही तपासात आढळले आहे. या प्रकरणी पुढचा तपास सुरु आहे.


अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांच्या जावयाचा जामीन मंजूर झाला आहे. ड्रग्ज प्रकरणात नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना अटक करण्यात आली होती.


दिल्लीत गेल्या २४ तासांत ३२ नवे कोरोनाबाधित आढळले असून एकही रुग्णांचा मृत्यू झाला नाही आहे. तसेच ३७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या दिल्लीत ३६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


भाजप नेते किरीट सोमय्या मुंबईतील सिद्धिविनायक गणपतीच्या दर्शनाला गेले आहेत. मात्र दर्शन घेण्यासाठी त्यांना पोलिसांकडून अडवण्यात आले. सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन किरीट सोमय्या कोल्हापूर दौऱ्यावर निघणार आहेत. कोल्हापूरात मुरगूड पोलीस ठाण्यात मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात किरीट सोमय्या गुन्हा दाखल करणार आहेत.


जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जनतेशी संवाद


आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात थ्री-डी मॅपिंगलचा ढोल, संपूर्ण मुंबईत खड्ड्यांचा झोल आहे. वरळी आणि कलानगर सोडून मुंबईचं अस्तित्व आहे की नाही? असा सवाल भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला. ९२७ खड्डे बुजवण्यासाठी ४८ कोटी खर्च का करता? खड्डे बुजवण्यासाठी महामार्गाला लागणारा खर्च तेला जातोय,अशी टीका भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली.


आनंदराव अडसूळ यांच्यावर केलेल्या ईडी कारवाई नंतर खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया देत, ईडी हे भाजप उपकार्यालय आहे. यंत्रणांचा राजकीय वापर सुरु असून केवळ सत्तेपोटी असे आरोप केले जात आहेत. यंत्रणांचा वापर विरोधकांना छळण्यासाठी होत आहे. अडसूळांवर आरोप करणारे धुतल्या तांदळासारखे आहेत का? रवी राणा स्वत: भ्रष्टाचारी आहेत,अशी प्रतिक्रिया  दिली आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदीचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयुष्मान भारत डिजिटल मिशनचा शुभारंभ करण्यात आला.  आयुषमान भारत डिजिटल मिशनमुळे जनतेचे जीवन सुधारेल असे पंतप्रधान मोदी म्हणाले. उपचारांसाठी डॉक्टरकडे गेल्यानंतर हेल्थ कार्डमध्ये जमा केलेला डिजिटल रेकॉर्ड उपलब्ध होणार. देशातील नागरिकांना डिजिटल आरोग्य क्रमांक दिला जाणार आहे. भारतीयांच्या आरोग्याची माहिती डिजिटल स्वरुपात संकलित करण्यात येणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.


 पंतप्रधान नरेंद्र मोदीचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयुष्मान भारत डिजिटल मिशनचा शुभारंभ करण्यात आला.  आयुषमान भारत डिजिटल मिशनमुळे जनतेचे जीवन सुधारेल असे पंतप्रधान मोदी म्हणाले.


आनंदराव अडसूळ गोरेगावच्या लाईफ लाईन रुग्णालयात दाखल


पंतप्रधान नरेंद्र मोदीचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयुष्मान भारत डिजिटल मिशनचा शुभारंभ


आनंदराव अडसूळ यांच्या वैद्यकीय तपासणासाठी डॉक्टर अडसूळ यांच्या घरी दाखल झाले आहेत.


आनंदराव अडसूळ यांना ईडीकडून ताब्यात घेण्याची शक्यता


 

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याविरोधात आज शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीत अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी चक्का जाम केला असून दिल्लीतील गुरुग्राम येथे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. त्याचप्रमाणे गुरुग्राम दिल्ली सीमेवरुन दिल्लीत प्रवेश करणाऱ्या प्रवासी वाहनांची दिल्ली पोलीस आणि पॅरामिलेट्रीकडून तपासणी करण्यात येत आहे.


आनंदराव अडसूळ यांची ईडीकडून चौकशी सुरू करण्यात आली असून अडसूळ यांच्या अमरावतीच्या घरी ईडीची छापेमारी सुरू आहे. आमदार रवी राणा यांच्या आरोपानंतर सिटी को-ऑप बँक घोटाळा प्रकरणी ईडीकडून समन्स बजावण्यात आले होते.


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासात २६,०४२ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून, २७६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच २९,६२१ रुग्ण बरे होऊन सुखरुप घरी परतले आहेत. देशात सध्या २,९९,६२० अँक्टिव्ह रुग्ण आहेत.


शिवसेनेचे माजी खासदार आनंद अडसूळ यांना सिटी को-ऑप बँक घोटाळा प्रकरणी ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. आनंद अडसूळ यांचा मुलगा अभिजीत अडसूळ यांना देखील ईडीचे समन्स बजावण्यात आलेत.


शेतकऱ्यांनी हरियाणाज कुरुक्षेत्र येथील शहाबाद परिसरातील दिल्ली- अमृतसर हायवे रोखला


दिल्ली,यूपी आणि हरियाणामध्ये शेतकऱ्यांची भारत बंद विरोधात निदर्शने करण्यात येत आहेत. दिल्लीतील गाजीपुर बॉर्डर,भंभू बॉर्डरवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. त्याचप्रमाणे दिल्ली – अमृतसर, दिल्ली – अंबालसह अनेक ठिकाणी शेतकरी भारत बंद आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत.


आज उद्या राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली असून २७ सप्टेंबर रोजी विदर्भ आणि मराठवाड्यात सर्वत्र पाऊस असेल तर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. २८ सप्टेंबर रोजी कोकण,मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम असेल तसेच घाट परिसरातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -