Tuesday, September 28, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Live Update: मुंबईत २४ तासांत ३६३ नव्या रुग्णांची नोंद, ९ जणांचा मृत्यू

Live Update: मुंबईत २४ तासांत ३६३ नव्या रुग्णांची नोंद, ९ जणांचा मृत्यू

Related Story

- Advertisement -

मुंबई गेल्या २४ तासांत ३६३ नवे कोरोनाबाधित आढळले असून ९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ४३८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत ४ हजार ४३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


- Advertisement -

गेल्या २४ तासांत राज्यात ६ हजार १२६ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून १९५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ७ हजार ४३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात ७२ हजार ८१० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


- Advertisement -

मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर ५० टक्क्यांची मर्यादा वाढवावी लागेल, अशी मागणी खासदार संभाजीराजेंकडून करण्यात आली आहे.


आरक्षणासाठी ५० टक्क्यांची मर्यादा जाणे गरजेचं – अशोक चव्हाण


राज्यांना अधिकार देऊन आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही – अशोक चव्हाण


केंद्रीय मंत्रिमंडळाचा आजचा निर्णय अर्धवट – अशोक चव्हाण


आरक्षणावरून ढकलाढकली करणं अयोग्य – अशोक चव्हाण


राज्यांना अधिकार देऊन प्रश्न सुटेल हा गैरसमज – अशोक चव्हाण


घटना दुरुस्तीचा प्रस्ताव मंजूर करून अर्धवट काम झालं – अशोक चव्हाण


राज्यांना अधिकार देऊन आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही – अशोक चव्हाण


केंद्रीय मंत्रिमंडळाकडून १०२व्या घटनादुरुस्तीच्या प्रस्तावाला मंजूरी – अशोक चव्हाण


सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग जी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली.


सध्या मुंबई भेटीवर असलेले सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमंग यांनी बुधवारी (दि. ४) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.


केरळमध्ये वीकेंड लॉकडाऊन फक्त रविवारी लावला जाईल. आठवड्याभरात सुरू असलेल्या दुकानाची वेळ सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत असेल. विवाह आणि अंत्यसंस्कारांमध्ये जास्तीत जास्त २० लोकांना परवानगी असेल. १५ ऑगस्ट आणि २२ ऑगस्टला लॉकडाऊन असणार नाही आहे.


मराठा आरक्षणासाठी राज्य-केंद्रामध्ये समन्वयाची गरज – खासदार संभाजीराजे छत्रपती


टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिला हॉकी संघाची फायनल मॅच सुरु, भारतीय संघाकडून पहिला गोल


पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना फोन, राज्यातील आपत्तीचा घेतला आढावा


राज्यसभा टीएमसी खासदार, डोला सेन, नदिम उल हक, अर्पिता घोष, शांता छेत्री आणि अबीर रंजन बिस्वास यांना सभागृहाच्या कामकाजामधून एक दिवस निलंबित करण्यात आले आहे. सभागृहात गैरवर्तन केल्यामुळे राज्यसभा सभापती व्यंकैया नायडू यांची कारवाई


लोकसभेची प्रतिष्ठा राखा, खासदारांच्या गदारोळावर सभापतींची नाराजी, संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाच्या आमदारांनी गदारोळ घातला आहे. या गदरोळावर लोकसभा सभापतींनी खासदारांना ठणकावलं आहे.


टोकियो ऑलिम्पिकमध्ये ६९ किलो वजनी गटात लवलीनाला कांस्य पदक

बॉक्सर लवलीनाचा सेमी फायनलमध्ये बुसेनाझकडून लवलीनाचा पराभव


MPSC विद्यार्थ्यांना दिलासा, अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा ४ सप्टेंबरला होणार

 

कोरोनामुळे अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा लांबणीवर गेली होती. ९ एप्रिलला ही परीक्षा होणार होती परंतू कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती. अखेर ४ सप्टेंबरला परीक्षा घ्यायला आपत्ती व्यवस्थापन विभागाला परवानगी दिली आहे.


मनसुख हिरेनच्या हत्येसाठी आरोपींना ४५ लाख रुपये दिले – एनआयएचा कोर्टात दावा


मुंबई गुन्हे शाखेकेच्या प्रॉपर्टी सेलने आर्म्सप्राईम मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संचालक सौरभ कुशवाह यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात बाजवले समन्स


पुण्यात मद्यधुंद तरुणीचा रस्त्यावर झोपून वाहतूक अडविण्याचा प्रयत्न, पोलिसांचा घटनास्थळी पोहचून तरुणीची समजूत काढण्याचा प्रयत्न


टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय भालाफेक खेळाडू नीरज चोप्राने सेमी फायनलमध्ये चांगलं यश मिळवत फायनलमध्ये जागा बनवली आहे. नीरज चोप्राने ८६.६५ चा थ्रो करत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.


आज मुंबईत लसीकरण बंद

 

- Advertisement -