पंचागानुसार, 14 जानेवारी 2022, शुक्रवारी मकर संक्रांती ( Makar Sankranti 2022) साजरी केली जाणार आहे. या दिवशी सूर्य देव मकर राशीत प्रवेश करतो. मकर संक्रांतीच्या दिवशी वातावरणात देखील बदल होण्यास सुरुवात होते. असे मानले जाते की, मकर संक्रांतीनंतर दिवस मोठा आणि रात्र छोटी होते. त्याचप्रमाणे हिवाळा देखील कमी होऊ लागतो. शास्त्रात सूर्य देवाला जागचा मित्र म्हटले गेले आहे. पौराणिक कथांनुसार, भगवान महादेवाच्या तीन नेत्रांपैकी एका नेत्राला सूर्य देवाची उपमा दिली गेली आहे. कारण या जगात सूर्य देवालाच माणूस प्रत्यक्ष पाहू शकतो.
गणपतीची उपासना केली जाते. त्याचप्रमाणे भगवान शिव, विष्णू, दुर्गा देवी आणि सूर्याची उपासना केली जाते. मात्र या सगळ्या उपासनेतील सूर्य देवाची उपासना अति आवश्यक मानली जाते. सूर्य देवाची उपासना केल्याशिवाय कोणतीही फलप्राप्ती होत नाही असे मानले जाते. त्यामुळे सूर्य देवाची नित्य पूजा केली पाहिजे. दररोज सूर्य पूजा केल्याने आपल्या शक्ती प्राप्त होते. सूतक काळात देखील सूर्य देवाला मानसिक रुपात पाणी देण्याचे शास्त्र आहे. सूर्याची पूजा करण्यासाठी मकर संक्रांतीचा दिवस सर्वांत चांगला मानला जातो. यादिवशी सूर्याची पूजा कशी करायची जाणून घ्या.
सूर्य पूजन कुठे आणि कसे करायचे?
सूर्य नारायणला अर्घ्य ( सूर्याला जल वाहणे ) जलाशय, नदीच्या आसपासच्या परिसरात दिले पाहिजे. इथे जाणे शक्य नसल्यास घराच्या गच्चीत जाऊन सूर्य दिसतो त्या ठिकाणी सूर्य देवाची पूजा केली पाहिजे.
शास्त्रानुसार, सूर्य देवाला अर्घ्य अर्पण करताना दोन्ही हातांच्या अंजलीने जल घ्यावे. पण जल घेताना हाताची तर्जनी आणि अंगठा एकमेकांना स्पर्श करू नयेत हे लक्षात ठेवावे. असे केल्यास याचे कोणतेही फळ मिळत नाही. या मुद्रेला राक्षसी मुद्रा असे म्हणतात. त्याचप्रमाणे तांबे किंवा पितळेच्या तांब्यातून सूर्य देवाला अर्घ्य ( पाणी ) देण्याचे सांगितले जाते. गंगाजल, लाल चंदन, फुले इत्याही त्या पाण्यात टाकल्याने पाण्याचे मह्त्त्व आणखी वाढते. सूर्य देवाला तीन वेळा अर्घ्य द्यावे आणि प्रत्येक वेळा एक प्रदक्षिणा घालावी. असे केल्याने सूर्य देव प्रसन्न होतो असे म्हटले जाते.
अर्घ्य देताना हा मंत्र म्हणा
ऊँ ऐही सूर्यदेव सहस्त्रांशो तेजो राशि जगत्पते।
अनुकम्पय मां भक्त्या गृहणार्ध्य दिवाकर:।।
ऊँ सूर्याय नम: ऊँ आदित्याय नम: ऊँ नमो भास्कराय नम:। अर्घ्य समर्पयामि।।
हेही वाचा – Makar Sankranti 2022: मकर संक्रांतीशी काय आहे शनीचा संबंध? ‘हे’ काम केल्यास होते शनी दोष मुक्ती