घरक्राइमMalvani ISIS Case: मालवणी ISIS प्रकरणातील दोन्ही आरोपींना NIA कोर्टाने ८ वर्षांची...

Malvani ISIS Case: मालवणी ISIS प्रकरणातील दोन्ही आरोपींना NIA कोर्टाने ८ वर्षांची ठोठावली शिक्षा; १० हजार भरावा लागणार दंड

Subscribe

यापूर्वी आरोपी रिझवान अहमदने सहा वर्षांचा आणि मोहसीन सय्यदने साडेपाच वर्षांचा तुरुंगवास भोगला होता. आ

मालवणी आयएसआयएस प्रकरणात (Malvani ISIS Case) दोन्ही आरोपी तरुणांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने विशेष एनआयए कोर्टाने दोघांना ८ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. रिझवान अहमद आणि मोहसीन इब्राहिम सय्यद (Rizwan Ahmed & Mohsin Sayed) असे या दोन्ही आरोपींचे नाव आहे. या दोन्ही आरोपींना प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. कोर्टाने ठोठावलेला हा दंड भरला नाही तर दोन्ही आरोपींच्या शिक्षेत ३ महिन्यांची वाढ होणार आहे.

- Advertisement -

मालवणी आयएसआयएस प्रकरणी बुधवारी एनआयए विशेष कोर्टाने दोन्ही आरोपी रिझवान अहमद आणि मोहसीन इब्राहिम सय्यद यांना दोषी ठरवले होते. आज या आरोपींना कोणती शिक्षा द्यायची यासंदर्भात कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने दोन्ही आरोपींना ८ वर्षांची शिक्षा आणि १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. यापूर्वी आरोपी रिझवान अहमदने सहा वर्षांचा आणि मोहसीन सय्यदने साडेपाच वर्षांचा तुरुंगवास भोगला होता. आता मालवणी आयएसआयएस प्रकरणी या आरोपींना ८ वर्षांची शिक्षा भोगावी लागणार आहे.

नक्की काय आहे प्रकरण?

मुस्लिम तरुणांना इस्लामिक स्टेट (IS) मध्ये सामील होण्यासाठी कट्टरपंथी बनवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनी या तरुणांना भारतातील सहयोगी राष्ट्रांविरुद्ध युद्ध करण्यासाठी IS/ISIL/ISISचे सदस्य होण्यासाठी परदेशात प्रवास करण्यास प्रवृत्त केले होते. हा खटला मूळतः काळाचौकीच्या दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) ३० डिसेंबर २०१५ रोजी नोंदवला होता. त्यानंतर एनआयएने १८ मार्च २०१६ रोजी त्याची पुन्हा नोंद केली. मग तपास पूर्ण झाल्यानंतर एनआयएने १८ जुलै २०१६ आरोपपत्र दाखल केले होते.

- Advertisement -

दरम्यान तपासात उघड झाले आहे की, रिझवान अहमद आणि मोहसीन इब्राहिम सय्यद यांनी मालवणी भागातील असुरक्षित मुस्लिम तरुणांना भडकवले, धमकावले आणि प्रभावित केले. त्यांना इस्लामच्या कारणासाठी फिदाईन लढवय्ये बनण्यास भाग पाडले आणि त्यांना पाठविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.


हेही वाचा – धक्कादायक! रिक्षाच्या भाड्यासाठी पैसे नव्हते, पुण्यात परदेशी मुलीवर बलात्काराचा प्रसंग


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -