घरAssembly Battle 2022Manipur Exit Poll 2022 : मणिपूरमध्ये कोणाचं सरकार? जाणून घ्या एक्झिट पोलमध्ये...

Manipur Exit Poll 2022 : मणिपूरमध्ये कोणाचं सरकार? जाणून घ्या एक्झिट पोलमध्ये कोणी मारलीय बाजी?

Subscribe

यंदाच्या निवडणूका पार पडल्या असून उमेदवारांचे भाग्य मतदान पेटीत बंद झाले आहे. १० मार्चला या उमेदरांवारांच्या भाग्याच्या पेट्या उघडून मणिपूरसह देशातील पाच राज्यांच्या निवडणूकांचे निकाल हाती पडणार आहेत.

Manipur Exit Poll 2022 :  मणिपूर विधानसभा निवडणूका दोन टप्प्यात पार पडल्या. निवडणूकीचा पहिला टप्पा २८ फेब्रुवारीला तर दुसरा टप्पा ५ मार्च रोजी संपन्न झाला. मणिपूरमध्ये ६० विधानसभा जागांसाठी निवडणूका लढवल्या गेल्या. २०१७मध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्याने भाजपला मणिपूरमध्ये अपक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन करावे लागले होते. यंदाच्या निवडणूका पार पडल्या असून उमेदवारांचे भाग्य मतदान पेटीत बंद झाले आहे. १० मार्चला या उमेदरांवारांच्या भाग्याच्या पेट्या उघडून मणिपूरसह देशातील पाच राज्यांच्या निवडणूकांचे निकाल हाती पडणार आहेत. अशातच विविध एजन्सीमार्फत निकालाआधी एक्झिट पोल्स घेण्यात आले आहे. त्यानुसार मणिपूरमध्ये कोणाचे सरकार येईल याविषयी शक्यता वर्तवण्यात आली आहे. जाणून घ्या, काय आहे मणिपूरचा २०२२चा एक्झिट पोल

Zee News-DESIGNBOXED नुसार,
भाजप – २३-२८
काँग्रेस – १०-१४

- Advertisement -

झी न्यूजच्या एक्झिट् पोलनुसार, मणिपूरमध्ये यावेळी भाजपची सत्ता येण्याची शक्यता आहे.

India Newsच्या एक्टिट पोलनुसार,

- Advertisement -

भाजप – २३ – २८
काँग्रेस – १० – १४

News 18 Punjab – P – MARQ

भाजप – २७ – ३१
काँग्रेस – ११ – १७

ZEE NEWS DESIGN BOXED च्या एक्झिट पोलनुसार, मणिपूरमध्ये भाजपला ३२ ते ३८ जागा मिळण्याची शक्यता आहे. मणिपूरमध्ये काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर राहणार आहे. काँग्रेसला १२ -१७ जागा मिळण्याची शक्यता आहे. मणिपूर निवडणूकीत NPF ला ३-५ जागा मिळण्याची शक्यता आहे आणि NPP ला २-४ जागा मिळू शकतात.

मणिपूरमध्ये मतांच्या टक्केवारीत भाजपचा मोठा वाटा आहे. भाजपची मतांची टक्केवारी ३९ च्या जवळपास असू शकते. तर काँग्रेस ३० टक्के. NPF ९ टक्के NPP ६ टक्के मते मिळू शकतात. तर १६ टक्के मते ही इतरांच्या खात्यात जाऊ शकतात.


हेही वाचा – Manipur Election Phase 1 : मणिपूरमध्ये मतदानाचा पहिला टप्पा पूर्ण ! संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ७८.०३ टक्के मतदान

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -