घरताज्या घडामोडीमराठा आंदोलकांचा मुख्यमंत्र्यांना अल्टिमेटम

मराठा आंदोलकांचा मुख्यमंत्र्यांना अल्टिमेटम

Subscribe

6 आक्टोबरला ‘मातोश्री’पुढे धरणे,10 आक्टोबरला महाराष्ट्र बंद

मराठा आरक्षणप्रश्नी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारची भूमिका अधिकृतरित्या जाहीर केली पाहिजे. यासाठी त्यांना 5 आक्टोबरचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. या दिवसापर्यंत त्यांनी सरकारची भूमिका न मांडल्यास 6 ऑक्टोबरला ‘मातोश्री’ या निवासस्थानापुढे धरणे धरण्यात येणार आहे. तर 10 आक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची घोषणा करण्यात आली आहे. मराठा आंदोलकांनी आता थेट मुख्यमंत्र्यांनाच अल्टिमेटम दिल्याने राज्यातील महाआघाडी सरकारपुढे नवा पेच उभा राहिला आहे.

मराठा समाज समन्वय समितीची महत्वाची बैठक काल कोल्हापुरात पार पडली. या बैठकीतील निर्णयांची घोषणा पत्रकार परिषदेत समितीचे निमंत्रक आबा पाटील यांनी केली. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने मराठा तरुणांचे मोठे नुकसान झाले आहे. आरक्षणाबाबत सरकार कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याने तरुणांमध्ये संभ्रमाचे आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाल्याचे आबा पाटील म्हणाले. मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आल्याने सरकारने आपली भूमिका जाहीर करणे आवश्यक आहे. मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडून सरकारची भूमिका 5 आक्टोबरपर्यंत स्पष्ट करावी. समाजाशी संवाद साधावा. मंगळवारपर्यंत निर्णय न घेतल्यास 6 ऑक्टोबर रोजी आम्ही ‘मातोश्री’समोरच आंदोलन करू, असा इशारा आबा पाटील यांनी दिला.

- Advertisement -

आबा पाटील यांनी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली. मराठा आरक्षणाला स्थगिती असतानाही एमपीएससी परीक्षा घेण्याचा घाट कोण घालत आहे? त्यांची नावे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावी, असे आबा पाटील म्हणाले. ही परीक्षा तात्काळ पुढे ढकलण्यात यावी, अन्यथा एमपीएससीचे परीक्षा केंद्र फोडले जाईल, असा इशाराही देण्यात आला. विवेक रहाडे या विद्यार्थाची आत्महत्या हे त्याचे एकट्याचे बलिदान नाही. या बलिदानामुळे आता तरी सरकारने जागे व्हावे, असे आबा पाटील म्हणाले.

10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद
मराठा आंदोलकांनी 10 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. हा बंद शांततेत करण्यात येईल, असे पाटील यांनी स्पष्ट केले. कुणीही त्या दिवशी तोडफोड करू नये, असे आवाहनही मराठा आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले. बंदमधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आल्याचेही आबा पाटील म्हणाले. बंद दरम्यान काही महामार्ग अडवले जातील. रास्तारोको केला जाईल. बंदला हिंसक वळण लागले तर त्याला सरकारच जबाबदार असेल, असे आबा पाटील यांनी बजावले.

- Advertisement -

केंद्र सरकारने दिलेल्या 10 टक्के आरक्षणाच्या सवलती जाहीर करा, मेगा भरतीला स्थगिती द्या, मराठा समाजावर आंदोलन करताना दाखल झालेले गुन्हे मागे घ्या, आदी मागण्यांचा पुनरुच्चारही सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. नुकत्याच पार पडलेल्या गोलमेज परिषदेत 51 संघटना सहभागी झाल्या होत्या. या संघटनांचे 200 प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत सर्वानुमते 10 तारखेच्या बंदचा निर्णय घेण्यात आल्याचे आबा पाटील यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -