घरक्राइमयामुळे लग्नाच्या तीन दिवसांपूर्वी तरुणांचा कापला प्रायव्हेट पार्ट!

यामुळे लग्नाच्या तीन दिवसांपूर्वी तरुणांचा कापला प्रायव्हेट पार्ट!

Subscribe

असे नेमके काय घडले? ज्यामुळे तरुणांचा प्रायव्हेट पार्ट कापला.

लग्नाच्या तीन दिवसांपूर्वी एका तरुणांचा प्रायव्हेट पार्ट कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन मित्रांमध्ये पैशाच्या देवाणघेवाण संदर्भात इतका वाद वाढला आणि त्यानंतर एका तरुणाचे अपहरण केले. त्याला जंगलात नेले आणि लग्नाच्या तीन दिवसांपूर्वी त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यात घडली आहे. माहितीनुसार, हे प्रकरण कोतवाली शहरा अंतर्गत ईदगाह परिसरातील आहे. पीडित समीर नावाच्या तरुणाने त्याच्याच मित्र परवेजसोबत एक लाख रुपयांसंदर्भात वाद सुरू होता.

घटनास्थळावरून आरोपी झाले फरार

पीडित तरुण समीरने दिलेल्या माहितीनुसार, ‘त्याच्या मित्र परवेजचे नाव घेऊन दोन तरुण त्याच्या जवळ पोहोचले आणि त्याला पैस देण्यासाठी सांगत होते. तसेच त्याला तात्काळ देण्यासाठी आग्रह करत होतो. त्यानंतर त्या दोन तरुणांनी समीरला एका जंगलात घेऊन गेले आणि त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला. यानंतर पीडित तरुणाला जंगलात सोडून ते दोघे फरार झाले.’

- Advertisement -

तरुणाच्या मित्राने दोन व्यक्तींना हाताशी धरून हा कट रचला होता आणि त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला, असा आरोप करण्यात आला आहे.

पीडित तरुणांनी प्रकृती चिंताजनक

या घटनेनंतर त्वरित याबाबत समीरने आपल्या नातेवाईकांना कळवले. मग तरुणाला गंभीर परिस्थितीत जिल्ह्या रुग्णालयात दाखल केले. पण तिथे त्याची प्रकृती पाहून त्याला हायर सेंटर मेरठमध्ये हलविण्यात आले. जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या माहितीनुसार तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘या’मुळे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या सहलेखकाने केली आत्महत्या


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -