तळोजा औद्योगिक वसाहती मधील केमस्पेक कारखान्यात आग

अग्निशामक दलाचे शर्थीचे प्रयत्न

Massive fire at Kemspec factory in Taloja industrial estate
तळोजा औद्योगिक वसाहतीतील केमस्पेक कारखान्यात भीषण आग

तळोजा एमआयडीसी मधील केमस्पेक या केमिकल कारखान्याला आज मंगळवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही . घटनास्थळी अग्निशामक दल पोलीस तात्काळ रवाना झाले. आग नियंत्रणात आणण्यासाठी उशिरापर्यंत शर्थीचे प्रयत्न सुरू होते. या कारखान्यात वारंवार आगीच्या घटना घडत असल्याचे तिथे उपस्थितांनी सांगितले. तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या कारखान्यांमधील केमिकल कारखान्यांचा भरणा मोठ्या प्रमाणात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रसायन मिश्रीत प्रक्रिया सुरू आगीची घटना घडल्याचे कळते.

 


हे ही वाचा – दिल्लीतून १५ वर्षांपासून लपून बसलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक, AK-47 सह मोठा शस्त्र साठा जप्त