घरताज्या घडामोडीमुलाखतीच्या अटींसाठी संजय राऊत यांच्याशी भेट

मुलाखतीच्या अटींसाठी संजय राऊत यांच्याशी भेट

Subscribe

शिवसेनेच्या ‘सामना’ दैनिकासाठी माझी मुलाखत घेण्याची संजय राऊत यांची इच्छा आहे. याच मुलाखतीसंदर्भात आमची बैठक झाली. या मुलाखतीसंदर्भात मी त्यांना काही अटी घातल्या होत्या. त्यासाठीच भेट झाली, असा खुलासा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. शनिवारची संध्याकाळ देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची हॉटेलमध्ये बैठक झाली. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळासाठी खळबळ उडाली होती. या दोन्ही नेत्यांच्या भेटीने वेगवेगळ्या चर्चांचे पेव फुटले होते.

राज्याचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्यात शनिवारी मुंबईतील हयात हॉटेलमध्ये भेट झाली. या भेटीवरून वेगवेगळे तर्कविर्तक राज्यात लावले जात असून, खासदार संजय राऊत यांनी भेटीमागील कारणांचा उलगडा केला होता. त्यानंतर आता फडणवीस यांनीही भेटीचे कारण सांगितले.

- Advertisement -

एएनआय वृत्तसंस्थेला बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिवसेनेच्या ‘सामना’ दैनिकासाठी माझी मुलाखत घेण्याची संजय राऊत यांची इच्छा आहे. याच मुलाखतीसंदर्भात आमची बैठक झाली. या मुलाखतीसंदर्भात मी त्यांना काही अटी घातल्या होत्या. त्यासाठीच भेट झाली. बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. कुठलाही भाग न वगळता मुलाखत प्रसिद्ध करण्यात यावी, अशी अट मी त्यांना घातली होती, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

शिवसेनेसोबत कोणतीही चर्चा सुरू नाही. त्यांच्यासोबत सरकार स्थापन करण्याची कोणतीही चर्चा बैठकीत केली नाही. त्यासाठी असे कोणतेही कारण नाही. जे सरकारचे काम सुरू आहे. त्यावर जनतेमध्ये प्रचंड आक्रोश आहे. त्यामुळे हे सरकार आपल्या कृतीमुळे कोसळेल. ज्यावेळी हे सरकार पडेल त्यावेळी आम्ही बघू; पण सरकार बनवण्याची कोणतीही घाई भाजपला नाही, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -