घरताज्या घडामोडीआरोग्य मिशनमध्ये ४०० कोटींचा नियुक्ती घोटाळा ?

आरोग्य मिशनमध्ये ४०० कोटींचा नियुक्ती घोटाळा ?

Subscribe

केंद्र सरकारच्या निधीतून राष्ट्रीय आरोग्य मिशनची अंमलबजावणी करताना ४०० कोटींचा आर्थिक व्यवहार करण्यात आला असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मिशन अंतर्गत सेवेत कायम नियुक्त्या देण्याच्या नावाखाली हा भ्रष्टाचार झाल्याचे फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळवले आहे.या कथित घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय आरोग्य मिशन (एनएचएम) या केंद्राच्या योजनेतील निधीतून राज्यात उपक्रम राबवले जातात. उमेदवारांच्या नियुक्त्या हाही याच उपक्रमाचा भाग होता. या योजनेत कंत्राटी तत्त्वावर काम करणार्‍यांना सेवेत कायम नियुक्त्या देण्यासंदर्भातील काही विधाने मंत्र्यांकडून आल्यानंतर, कायमस्वरूपी नियुक्त्यांसाठी संपूर्ण राज्यात आर्थिक देवाणघेवाण सुरू झाली असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.

- Advertisement -

या आरोपापृष्ट्यर्थ दूरध्वनी संवादाच्या तीन ऑडिओ क्लिप फडणवीस यांनी या पत्रासोबत जोडल्या आहेत. या ऑडिओ क्लिपमधील संवादानुसार, सुमारे २० हजार उमेदवार राज्यात असून, त्यांना सेवेत कायम करण्यासाठी, त्यांच्याकडून एक ते अडीच लाख रुपये गोळा केले जात आहेत, असे फडणवीसांचे म्हणणे आहे. हे लक्षात घेता यासाठी सुमारे ४०० कोटी रुपये गोळा करण्यात आल्याचे या पत्रात फडणवीस यांनी नमूद केले आहे.

हे सारे कुणाच्या आशीर्वादाने होत आहे, याचीही सखोल चौकशी करणे गरजेचे आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर हे घडत असेल तर ते गंभीर आहे, असे त्यांनी म्हटले आहे. उमेदवारांकडून शंभर रुपयांचे सहमतीपत्र आणि ५०० रुपये लढा निधी घेतला जात आहे. सोबत दोन लाख रुपये रोख घेतले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

- Advertisement -

ही रोख देताना नोटा या ५०० आणि २००० रुपयांच्याच असाव्यात, असेही सांगितले जात आहे. हा पैसा देण्यासाठी अनेकांनी कर्ज घेतले आणि त्यांनी तो पैसा जमा केला. काहींनी खास बँक खाती सुद्धा यासाठी उघडली गेली आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -