संतापजनक! ३५ वर्षांच्या महिलेने १६ वर्षांच्या मुलावर दोनदा केला लैंगिक अत्याचार, अन् बलात्काराच्या केसची दिली धमकी

Crime Minor Boy

देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. तर दुसऱ्या बाजूला अनेक धक्कादायक आणि संतापजनक घटना घडताना दिसत आहेत. एका ३५ वर्षांच्या महिलेने १६ वर्षांच्या मुलासोबत लैंगिक शोषण केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. मध्य प्रदेशच्या राजगढ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेने मुलासोबत एवढेच केले नाही तर तिचा पती आणि सासू-सासऱ्याने मुलाला बलात्काराच्या गुन्हात अडकवण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी महिला आणि तिच्या कुटुंबियांना अटक केली आहे.

राजगढ पोलिसांनी महिलेला पोक्सो कायद्याच्या कलम ५/६ अन्वये अटक केली आहे. तर पती आणि सासू-सासऱ्याला कलम ३८४ आणि ४२७ नुसार अटक केली आहे.

राजगढच्या एसपी प्रदीप शर्मा या्ंनी सांगितले की, ‘महिलेने आपल्याच गावातील मुलाचे दोन वेळा लैंगिक शोषण केले. याबाबत २७ मेला महिलेच्या पतीला आणि सासू-सासऱ्याला समजले. त्यानंतर मुलाच्या कुटुंबियांकडून १ लाख रुपयांची मागणी केली आणि खोट्या बलात्काराच्या गुन्हात अडकवण्याची धमकी दिली. जेव्हा मुलाच्या कुटुंबियांनी पैसे देण्यास नकार दिला तर महिलेच्या पती आणि सासू-सासऱ्याने त्याच्या शेतात लावले पपईचे झाडं कापून टाकले. या सगळ्याला कंटाळून शेवटी अल्पवयीन मुलाने राजगढच्या चाईल्ड लाईनला माहिती दिली. राजगढच्या चाईल्ड लाईन काउंसलर मनीषा दांगी यांनी मुलाचे काउंसलिंग केले आणि सोमवारी पोलिसांना याबाबत माहिती दिली.’

दांगी यांनी सांगितले की, ‘या घटनेमुळे अल्पवयीन मुलगा नैराश्यात होता. त्याला बदनामी होण्याची भीती होती, त्यामुळे त्याने या घटनेबाबत कोणाला सांगितले नव्हते. जेव्हा महिलेच्या कुटुंबाने त्याच्या कुटुंबाला त्रास देण्यास सुरुवात केली, तेव्हा मुलाने हिम्मत करून आम्हाला सर्व माहिती दिली. आम्ही अजूनही त्याचे काउंसलिंग करत आहोत.’


हेही वाचा – तरुणीचं मॅट्रिमोनियल साईटवर ठरलं लग्न; होणाऱ्या नवऱ्याने ८ लाखाला लावला चुना