Mission Kavach Kundal : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात ८ ते १५ ऑक्टोबर दरम्यान खास लसीकरण मोहीम

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मिशन कवच कुंडलची घोषणा केली

Mission Kavach Kundal: Special vaccination campaign in Panvel Municipal Corporation 
Mission Kavach Kundal : पनवेल महानगरपालिकेत ८ ते १५ ऑक्टोबर दरम्यान खास लसीकरण मोहीम

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेची भिती व्यक्त केली जात आहे.मिशन कवच कुंडल अंतर्गत दिवसापोटी १५ लाख इतक्या मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात येणार आहे. राज्याकडे सध्या १ कोटी डोस उपलब्ध आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात तिसऱ्या लाटेची भीती कमी करण्यासाठीच ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.कोरोना हद्दपार व्हावा याद्ष्टीने राज्यात वेगाने लसीकरण करण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मिशन कवच कुंडलची घोषणा केली आहे. त्या अनुषंगाने दिनांक ८ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर या दरम्यान खास लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत १00% नागरिकांचा पहिला डोसचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पालिकेने ठेवले आहे. पालिका क्षेत्रातील आतापर्यंतचे एकही डोस न घेतलेल्या नागरिकांनी जवळच्या लसीकरण केंद्रावरती जाऊन आपले लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.

याचबरोबर दिनांक ११ ऑक्टोबरला फक्त महिलांसाठी सर्व लसीकरण केंद्रावरती खास सोय करण्यात येणार आहे. या दिवशी पालिका क्षेत्रातील अत्तापर्यंत एकही डोस न घेतलेल्या महिलांनी आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रावरती जाऊन लसीकरण करून घ्यावे. तसेच पनवेल क्षेत्रातील सोसायट्यांनी आपल्या सोसायटीधारकांचे १००% लसीकरण पूर्ण करून घेण्यासाठी पालिकेच्या वैद्यकिय आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. ज्या सोसायट्यांमधील १०० ते १०० पेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण राहीले आहे अशा सोसायट्यांमध्ये पालिकेच्यावतीने लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे.अशा सोसायट्यांनी पालिकेच्या वैद्यकिय आरोग्य् विभागाशी संपर्क साधावा.


हे ही वाचा – Mission Kavach Kundal : कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी ‘मिशन कवच कुंडल’