घरElection 2023Mizoram Assembly Election Result 2023 : इंदिरा गांधीचे सुरक्षा प्रमुख CM पदाच्या...

Mizoram Assembly Election Result 2023 : इंदिरा गांधीचे सुरक्षा प्रमुख CM पदाच्या शर्यतीत सर्वात पुढे

Subscribe

Mizoram Assembly Election Result 2023 इंफाळ – मिझोरम विधानसभेच्या 40 जागांसाठी झालेल्या निवडणुकीनंतर आज (सोमवार) मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सकाळी 8 वाजता पोस्टल बॅलेट मोजणी सुरु झाली आहे. सुरवातीच्या कलानुसार, झोरम पीपल्स मुव्हमेंट बहुमताच्या जवळ जात आहे. सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट मागे फेकली गेली आहे. तर काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर दिसत आहे, तर भाजपा खातेही उघडताना दिसत नाही.

झोरम पीपल्स मुव्हमेंटचा (ZPM) 25 जागांवर विजय. दोन जागांवर आघाडी. आयझोल येथील पक्ष कार्यालयात जल्लोष

- Advertisement -

पाच राज्यांच्या विधानसभांसोबतच मिझोराममध्ये मतदान झाले. मतमोजणीही पाच राज्यांसोबतच होणार होती, मात्र निवडणूक आयोगाने मतमोजणीच्या तारखेत बदल केला. मतमोजणीच्या तारखेत बदल करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते. त्यात म्हटले होते, की मिझो नागरिकांसाठी रविवारचा दिवस हा पूजेसाठी समर्पित असतो.

- Advertisement -

हेही वाचा : Telangana DGP : तेलंगणाच्या महासंचालकांना ‘ती’ एक चूक पडली महागात, ECI ने केली निलंबनाची कारवाई

मिझोरामध्ये 7 नोव्हेंबर रोजी विधानसभेच्या 40 जागांसाठी 77.04% मतदान झाले. इथे मिझो नॅशनल फ्रंट (MNF), झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) आणि काँग्रेस (Congress) यांच्यात प्रामुख्याने लढत आहे. भारतीय जनता पक्षही येथे निवडणूक लढवत आहे. मात्र भाजपचे स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मिझोरामध्ये प्रचाराला उतरले नव्हते.

2018 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस येथे सत्तेवरुन पायउतार झाली. त्यापूर्वी 2008 ते 2018 असे सलग दहा वर्षे काँग्रेसची मिझोराममध्ये सत्ता होती. त्यांना मिझो नॅशनल फ्रंटने (MNF) जोरदार टक्कर देत 2018 मध्ये पराभूत केले होते. त्यानंतर MNF चे झोरमथांगा हे मुख्यमंत्री झाले. एमएनएफला 26, काँग्रेस 5, आणि भाजपने एका जागेने येथे खाते उघडले होते. तर 8 अपक्ष विजयी झाले होते.

इंदिरा गांधीचे सुरक्षा प्रमुख आता कट्टर काँग्रेस विरोधक

मिझोरामध्ये यंदा मुख्यमंत्री पदासाठी सर्वाधिक चर्चित चेहरा आहे तो म्हणजे झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) चे प्रमुख माजी आयपीएस अधिकारी लालदुहोमा. लादुहोमा हे पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे सुरक्षा प्रमुख राहिलेले आहेत. 1984 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसच्या तिकीटावर ते खासदारही झाले होते. मात्र अंतर्गत वादानंतर त्यांनी काँग्रेस सोडली आणि झोरम पीपल्स मूव्हमेंटची (ZPM) स्थापना केली.

विधानसभा निवडणुकीनंतर आलेल्या एक्झिट पोलनुसार झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) सत्तेच्या जवळ जाताना दिसत आहे. मात्र कोणत्याही पक्षाला येथे स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नसल्यामुळ त्रिशंकू विधानसभा होण्याचे संकेत एक्झिट पोलमधून मिळाले आहेत.
एक्झिट पोलनुसार, झोरम पीपल्स मूव्हमेंटला (ZPM) सर्वाधिक 16 जागा, मिझो नॅशनल फ्रंटला (MNF) 15, काँग्रेस – 7 आणि भाजपला – 1 जागा मिळत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हेही वाचा : काँग्रेस एकटी लढली आणि ‘एकटी’ पडली! 

पाच राज्यांची विधानसभा निवडणूक नोव्हेंबरमध्ये झाली. यातील चार राज्यांचे निकाल रविवारी जाहीर झाले. त्यात मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या तीन राज्यांत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तर तेलंगणामध्ये काँग्रेसने मुसंडी मारली आहे. दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या केसीआर यांना काँग्रेसच्या रेवंथ रेड्डी यांनी पायउतार होण्यास भाग पाडले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -