घरठाणेमराठी मुलांना नोकरी नसल्याच्या जाहिरातीवरून मनसे संतप्त; कंपनीने मागितली माफी

मराठी मुलांना नोकरी नसल्याच्या जाहिरातीवरून मनसे संतप्त; कंपनीने मागितली माफी

Subscribe

यापुढे या कंपनीत फक्त मराठी मुलांनाच प्राधान्य देणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.

ठाण्यातील वागळे इस्टेटमधील एका कंपनीत मराठी मुलांना नोकरी नसल्याची जाहिरात व्हायरल झाली होती. सदर बाब  लक्षात येताच मनसेने कंपनीच्या कार्यालयात धाव घेतली आणि जाब विचारला. याबद्दल सदरची जाहिरात हटवण्यात आली असून अशा पुढे असा कोणताही प्रकार घडणार नाही असे कंपनीच्या व्यवस्थापकाने सांगितले.  यापुढे या कंपनीत फक्त मराठी मुलांना नोकरीसाठी प्राधान्य देणार असल्याचे देखील व्यवस्थापकाने सांगितले. यापुढे जर असे प्रकार समोर आले तर कंपनीचे कार्यालय फोडल्याशिवाय मनसे शांत बसणार नाही. असा इशारा ​मनसे ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांनी इशारा दिला आहे.

ठाण्यातील वागळे इस्टेट बिझनेस पार्क येथील एमी कंपनीने नोकरी संदर्भात एक जाहिरात काढली होती.  त्या जाहिराती मधे मराठी मुलांना प्राधान्य दिले जाणार नसल्याचा उल्लेख केला होता. ही बातमी समजताच मनसेचे ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांनी तात्काळ कंपनीमध्ये धाव घेतली आणि जाहिरात बाबत विचारपूस केली. यापुढे जर अशा प्रकारची जाहिरात निघत असेल तर कंपनीची एकाच जागेवर ती राहणार नाही असा इशारा देखील कंपनीला दिला. त्यानंतर कंपनीच्या संचालकाने पुन्हा असा प्रकार घडणार नाही तसेच यापुढे मराठी मुलांना मोठ्या प्रमाणात प्राधान्य देणार असल्याचे सांगत त्यांनी जाहीर माफी मागितली.
मराठी मुलांना नोकरीत प्राधान्य देण्यात येईल असे परिपत्रकच कंपनीकडून मनसेच्यावतीने लिहून घेण्यात आले. यापुढे ठाण्यातील अशा कोणत्याही कंपनीने हिम्मत केली तर त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ. महाराष्ट्रात राहून जर मराठी मुलांना नोकरी मिळत नसतील तर कंपनीचा काही उपयोग नाही. असे प्रकार पुन्हा समोर आल्यास मनसे आक्रमक भूमिका घेणार असल्याचे रवींद्र मोरे यांनी सांगितले.

- Advertisement -

“मराठी मुलांच्या पाठीशी मनसे खंबीरपणे उभी आहे या जाहिराती बाबत कंपनीच्या व्यवस्थापकाने  माफी मागितली असून पुन्हा असा प्रकार घडणार नसल्याचे सांगितले आहे. यापुढे जर ठाण्यात अशा घटना घडल्या तर मनसे कंपनी फोडल्या शिवाय शांत बसणार नाही. मराठी माणसांसाठी माझ्यावर कोणताही गुन्हा दाखल झाला तरी हरकत नाही.
– रवींद्र मोरे मनसे ठाणे शहराध्यक्ष


हेही वाचा – राज्यमंत्रीमंडळाचा मोठा निर्णय ! पूरग्रस्तांसाठी कायमस्वरुपी उपायांसाठी ११ हजार ५०० कोटींची मंजुरी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -