मनसे अध्यक्ष राज ठाकरे नवी मुंबईकडे रवाना

raj thackeray news Vashi Tolnaka vandalism case Bail granted to Raj Thackeray
टोलनाका तोडफोड प्रकरण: राज ठाकरेंना जामीन मंजूर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे नवीन मुंबईकडे रवाना झाले आहेत. लवकरच राज ठाकरे बेलापूर कोर्टात हजर होणार आहे.  नवी मुंबईतील वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याविरोधात बेलापूर न्यायालयाने (Belapur court) वॉरंट जारी केले. त्यामुळे राज ठाकरे आज सकाळी ११ वाजता वाशी न्यायालयात हजर राहणार होते. २६ जानेवारी २०१४ रोजी वाशीमध्ये राज ठाकरे यांनी भडकावू भाषण केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. राज ठाकरे यांच्या या भाषणानंतर मनसैनिकांनी वाशी टोलनाक्याची तोडफोड केली होती. याप्रकरणी राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या या प्रकरणाची वाशी न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

मात्र, या प्रकरणी अनेक वेळा न्यायालयात हजर राहण्यास सांगूनही राज ठाकरे हजर झाले नव्हते. त्यामुळे आता बेलापूर न्यायालयाने राज ठाकरे यांच्याविरोधात वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे आज सकाळी ११ वाजता राज ठाकरे नवी मुंबईत दाखल होणार आहेत. तर राज ठाकरे येणार म्हणून मनसे कार्यकर्त्यांनी त्यांचं ग्रँड वेलकम करण्याचे ठरवलंय. नवी मुंबई पालिका निवडणूकीच्या तोंडावर राज ठाकरे येत असल्याने याचा राजकीय फायदा नक्कीच मनसेला होईल अशी आशा मनसैनिकांना वाटत आहे.

राज ठाकरेंच्या स्वागतासाठी नवी मुंबईत पोस्टर बाजी

नवी मुंबईतील वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात बेलापूर न्यायालयाने वॉरंट जारी केलं आहे. त्यामुळे राज ठाकरे आज (शनिवार) वाशी न्यायालयात हजर राहणार आहेत. विशेष म्हणजे, राज ठाकरेंच्या स्वागतासाठी मनसैनिकांनी टोलनाक्यावरच पोस्टरबाजी केली आहे.


हेही वाचा – प्रत्येकाला राज ठाकरे होता येत नाही- बाळा नांदगावकर