घरठाणेडोंबिवलीतील व्ही.जी.एन ज्वेलर्सला गुंतवणूकदारांसह मनसेचा घेराव

डोंबिवलीतील व्ही.जी.एन ज्वेलर्सला गुंतवणूकदारांसह मनसेचा घेराव

Subscribe

सहा महिने उलटूनही गुंतवणूकदारांना परतावा न मिळाल्याने गुंतवणूकदार हवालदिल

डोंबिवलीत काही वर्षांपूर्वी गुडविन ज्वेलर्स आणि प्रथमेश ज्वेलर्सने गुंतवणूकदारांना लाखोंचा गंडा घातला होता. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हे ही दाखल झाले होते. त्या पाठोपाठ आता डोंबिवली पूर्वेकडील व्ही.जी.एन ज्वेलर्सने देखील गेल्या आठ महिन्यांपासून गुंतवणूकदारांना परतावा न दिल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. याबाबत गुंतवणूकदारांनी व्ही.जी.एन ज्वेलर्सकडे परतावा मागितला. मात्र वारंवार उंबरठे झिजवून देखील दिलेल्या तारखांना पैसे मिळाले नाहीत. याबाबत गुंतवणूकदारांनी मनसेकडे धाव घेत गाऱ्हाणे मांडले आहे.

आज मनसे पदाधिकाऱ्यांसह गुंतवणूक दारांनी थेट व्ही.जी.एन ज्वेलर्सचे दुकान गाठले आणि जाब विचारत गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याची मागणी केली. यावेळी व्ही.जी.एन ज्वेलर्सच्या मॅनेजमेंटची मनसे पदाधिकारी आणि गुंतवणूक दारांसमवेत बैठक झाली. या बैठकीत ज्वेलर्सच्या वतीने आम्ही कुणाची फसवणूक करणार नाही, लॉकडाऊनमुळे आर्थिक संकट आहेच, मात्र येत्या काही महिन्यात डिसेंबरपर्यंत गुंतवणूकदारांचे पैसे परत देण्याचे आश्वासन दिले. यावेळी मनसेच्या वतीने दिलेल्या मुदतीत पैसे परत करा अन्यथा पुन्हा आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – संजीव जयस्वाल यांची कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अध्यक्षपदी नियुक्ती


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -