घरठाणेडोंबिवलीच्या ९० फूट रस्त्याचे काम पूर्ण करा, अन्यथा करू खळखट्याक; मनसेचा इशारा

डोंबिवलीच्या ९० फूट रस्त्याचे काम पूर्ण करा, अन्यथा करू खळखट्याक; मनसेचा इशारा

Subscribe

डोंबिवलीहून कल्याणला येण्या-जाण्यासाठी एक प्रमूख रस्ता असणाऱ्या ९० फुटी मार्गाची अक्षरशः दयनीय अवस्था झाली आहे. गेल्या वर्षभरापासून याठिकाणी सुरू असणाऱ्या खोदकामामुळे लोकांचे अतोनात हाल होत असून या प्रश्नावर मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज मनसे पदाधिकाऱ्यांनी पालिका अधिकाऱ्यांसमवेत या रस्त्याची पाहणी करत केडीएमसी अधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ दिला आणि येत्या २ दिवसांत ९० फूट रस्ता वाहतुकीसाठी खुला करा, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन छेडण्याचा अल्टीमेटम दिला आहे.

कल्याणहून डोंबिवलीला जाण्यासाठी आणि डोंबिवलीहून कल्याणला येण्यासाठी रेल्वे समांतर रस्त्याला लागून असणारा ९० फुटी रस्ता अत्यंत महत्वाचा आहे. मात्र समांतर रस्त्यापेक्षा या रस्त्याची अत्यंत खराब अवस्था झाली असून स्थानिक रहिवासी आणि नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. याबाबत मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज मनसे शहराध्यक्ष मनोज घरत यांनी या मार्गाची केडीएमसी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. तसेच आपला राग व्यक्त करण्यासाठी मनसेतर्फे यावेळी अधिकाऱ्यांना पुष्पगुच्छही देण्यात आला. शिवाय पुढील २ दिवसांत हा रस्ता वाहतुकीसाठी खुला न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

- Advertisement -


हेही वाचा – डोंबिवलीतील व्ही.जी.एन ज्वेलर्सला गुंतवणूकदारांसह मनसेचा घेराव

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -